दाह शमन करणारा दैवी वृक्ष : औदुंबर अर्थात उंबर. औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे. औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो.
औदुंबराखाली औदुंबराच्या छायेत पाणी ठेवून त्या पाण्याने स्ना’न करावे म्हणजे भागिरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. या कलियुगा मध्ये हा कल्पवृक्ष समजून औदुंबराची सेवा केली तर ज्या ज्या कामनेने आपण सेवा करू ती ती कामना पूर्ण होईल असा हा कल्पवृक्ष आहे. धन, धान्य, भू संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य या औदुंबराची सेवा केल्याने प्राप्त होते.
औदुंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते. किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. या वृक्षाचे काही अदभूत उपयोग पाहूया;
गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी, र’क्तप्रदर, श्वे’तप्रदर, मा’सिक पा’ळीच्या अति प्रमाणात र’क्तस्त्राव होईत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात सोबत यो’निमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो.
गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात. सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे.
लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचा चिक बत्ताशासोबत देतात. भस्मक नावाचा एक व्याधी आहे ज्यात व्यक्ती सारखे काही न काही खात असते. पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही काही वेळाने परत भूक लागते. या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात.
उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा. काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे.
उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा. त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे. कॅ’न्सर झाल्यावर जी के’मोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते. त्यात हे सरबत उत्तम आहे. दिवसातून तीनदा घ्यावे.
अतिसार होऊन त्यातून र’क्त पडत आसेल तर सालीचा काढा द्यावा. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटोल- सेव्लोन च्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते.
तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो.
सरते शेवटी एक गोष्ट सांगतो हिरण्यकश्यपूचे पोट फाडल्यावर भगवान नरसिंहाच्या बोटांचा दाह होऊ लागला. तो कशानेच थांबेना. मग त्यांनी त्यांची बोटे उंबराच्या फळात रोवली आणि त्यांचा दाह क्षणात कमी झाला. भगवान दत्तगुरूंना देखील ज्याच्या शीतल छायेत साधनेचा मोह आवरला नाही.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!