२०२४ च्या मार्चपर्यंत शनी ‘या’ राशीच्या लोकांना करतील लखपती? कुंडलीत साडेसातीचा प्रभाव कसा बदलणार, वाचा..

नववर्षाची सुरुवात व्हायला आता अवघे दोन महिने शिल्लक आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार २०२३ चे उर्वरित दोन महिने काही महत्त्वपूर्ण ग्रह गोचरांमुळे खास ठरणार आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच शनीदेव कुंभ राशीत मार्गी अवस्थेत येणार आहेत. एखादा ग्रह मार्गी होतो म्हणजे त्याच्या परिक्रमेत १८० अंश फिरून सरळ दिशेने वाटचाल करू लागतो.

शनिदेव नोव्हेंबर महिन्यात मार्गी होत असल्याचे २०२४ मध्येही काही राशींवर शनीची विशेष कृपा असणार आहे. शनीचे कुंभ राशीत गोचर होऊन आता १ वर्ष पूर्ण होणार आहे त्यामुळे शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुद्धा बदलू शकतो. येत्या २०२४ मध्ये नेमक्या कोणत्या राशींना लाभाचे संकेत आहेत व त्यांना नेमक्या कोणत्या मार्गाने शनी व लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो हे पाहूया..

२०२४ मध्ये शनी ‘या’ राशींना करणार श्रीमंत, साडेसातीचा प्रभाव बदलणार

सिंह रास (Leo Zodiac)
२०२४ चे सुरुवातीचे तीन महिने तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. आपल्या नवम स्थानात कुंभेचा शनी आपल्या भाग्य स्थानात आहे. हा शनीमुळे उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या विचारांचे व सल्ल्याचे स्वागत होईल. धर्मादाय कामात सार्वजनिक कामात आपला सहभाग मोलाचा ठरेल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. वर्षभर कार्यमग्न रहाल. राजकारणात वा सामाजिक कामात कायद्याची कक्षा जरुर पाळावी. शारिरीक ताकदीपेक्षामनाचे बळ खूप मोठे असते. अशावेळी आपली खरी मानसिकता आपल्या जिभेवर घोळत असते. त्यामुळे विचारपूर्वक बोलणे हिताचे ठरेल. तुमच्या उपजीविकेच्या साधनांमध्ये वाढ होईल. बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. व्यावसायिकांना यावेळी चांगला फायदा होऊ शकतो.

मकर रास (Capricorn Zodiac)
या राशीला शनी पाचवा येत आहे. मकर- कुंभ या दोन्ही बौद्धीक राशी असल्याने त्यांना नवे संशोधन नवे विचार करण्याची मांडण्याची संधी मिळेल. प्रगतीशील कामे होतील. समाजकार्यांत, राजकारणात संधी प्राप्त होतील. शेअर्स, म्युच्युअल फंड यात केलेली गुंतवणूक फायदेशील ठरेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणात विशेष प्रगती दिसून येईल. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहणार आहे. जोडीदाराची प्रगती होऊ शकते.

मेष रास (Aries Zodiac)
हा कालावधी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकतो. शनिदेव तुमच्या राशीतून भाग्य स्थानाकडे वाटचाल करणार आहेत. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही उच्च पदावर पोहोचू शकतात. या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. नवीन परिचय, नवीन गाठी भेटीतून होणारा आनंदाचा स्पर्श मनाला उभारी देईल. जागोजागी मदतीचे हात पुढे येतील. त्यातूनच आपणास संयम सावधानता आणि विनय या गुणांची खऱ्या अर्थाने ओळख होईल. इतकेच नव्हे तर हे आयुष्यभराचे मार्गदर्शक ठरतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *