२०२४ मध्ये गुरु ‘या’ राशींचा स्वामी बनून देईल अपार धनलाभ; तुमच्या राशीला कोणत्या रूपात मिळेल लक्ष्मीकृपा?

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह मार्गी किंवा वक्री होतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्वच राशींवर कमी अधिक प्रमाणात होत असतो. ग्रहाच्या प्रत्येक राशीतील स्थानावरून त्याचा प्रभाव ठरत असतो. आता येत्या दोन महिन्यांमध्ये गुरु ग्रहाच्या चालीत मोठा बदल होणार आहे. एप्रिल २०२३ मध्ये गुरुने मेष राशीत प्रवेश केला होता तर आता ३१ डिसेंबर २०२३ ला गुरू देव मार्गी होणार आहेत. सध्या गुरुची वक्री चाल सुरु आहे मार्गी होताना १८० अंशात फिरून गुरु सरळ मार्गी पुन्हा चालणार आहेत.

या ग्रहचालीचा प्रभाव १२ पैकी तीन राशींवर अत्यंत सकारात्मक व फायदेशीर होणार असल्याची सध्या चिन्हे आहेत. गुरु हा सुख, सौभाग्य, ऐश्वर्य, याचा कारक मानला जातो. २०२४ मध्ये प्रवेश घेण्याआधीच गुरूच्या मार्गी झाल्याने या राशींना प्रचंड व विशेषतः अनपेक्षित पद्दतीने धनलाभ होऊ शकतो. या नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..

मार्गी गुरु ‘या’ राशींना देणार अपार धन
मिथुन रास: (Gemini Rashi Bhavishya)
मिथुन राशीच्या लोकांना गुरू मार्गी झाल्याने आर्थिक मिळकतीचे मार्ग रुंदावल्याचे लक्षात येईल. या मंडळींना कामाच्या ठिकाणहून मिळणाऱ्या पगाराच्या व्यतिरक्त अन्य मार्गांनीं सुद्धा जास्त पैसे कमावता येऊ शकतात. काही प्रसंगांमध्ये मौन बाळगणेच शहाणपणाचे ठरू शकते. चैनीच्या व भौतिक सुख देणाऱ्या वस्तूंची खरेदी करता येऊ शकते. नोकरदार मंडळींना कामाच्या निमित्ताने वास्तव्याचे ठिकाण बदलावे लागू शकते. वैवाहिक जीवनात आधीपेक्षा जास्त चांगले व सुखाचे, गोडी- गुलाबीचे दिवस अनुभवता येऊ शकतात. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

कर्क रास: (Cancer Rashi Bhavishya)
कर्क राशीच्या मंडळींना गुरूच्या मार्गी होण्याचा लाभ कामाच्या ठिकाणी अनुभवता येऊ शकतो. अचानक तुम्हाला वरिष्ठांकडून मिळणारी वागणूक बदलू शकते. प्रलांबीत काळापासून रखडून पडलेले एखादी काम मार्गी लागू शकते. तुम्हाला पदोन्नतीसह पगारवाढीचा सुद्धा लाभ मिळू शकतो. इतके बदल होऊनही नोकरीमध्ये मन रमून राहण्याची शक्यता कमी आहे व्यवसायाची सुरुवात करण्याचा मानस असल्यास हा दिवाळी नंतरचा कालावधी शुभ ठरू शकतो.

धनु रास: (Sagittarius Rashi Bhavishya)
गुरु ग्रहाची सरळ चाल हे धनु राशीच्या मंडळींना खाजगी आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण देऊन जाऊ शकते. आपण संततीप्राप्तीसाठी प्रयत्न करत असल्यास येत्या काळात वेळ जुळून येऊ शकते. तुमच्या आयुष्यात नवीन लोकांचा प्रवेश होऊ शकतो जे तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येतील. वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीचा योग आहे. नाती सुधारण्यासाठी एखादी घटना घडू शकते. तुम्हाला प्रेमाच्या नात्यांना जपण्यासाठी एखादा प्रवास करावा लागू शकतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *