२२ दिवसांनी बुधादित्य राजयोग बनल्याने ‘या’ ५ राशींच्या दारी येईल लक्ष्मी? प्रत्येक नात्यात येईल सूर्यासारखी चमक…

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा वेळोवेळी गोचर,मार्गी, वक्री, अस्त, उदय होत असतो. अशावेळी त्यांचा प्रभाव अन्य ग्रहांच्या कक्षेत पडत असल्यास त्यातून अनेक शुभ राजयोग तयार होत असतात. ज्योतिषशास्त्रात काही राजयोगांना अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. विशेषतः ज्यात शनी, सूर्य, किंवा मोठे ग्रह एकत्र आलेले असतात. येत्या २२ दिवसात असाच एक राजयोग सूर्यदेव व बुधाच्या युतीने तयार होत आहेत.

१ ऑक्टोबरला बुध ग्रह हा कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी बुध ग्रह कन्या राशीत येणार आहेत. या राशीत सूर्यदेव आधीपासून प्रभावी असल्याने बुध व सूर्याच्या युतीने कन्या राशीमध्ये बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगासह तब्बल पाच राशींच्या नशिबाला कलाटणी मिळण्याचे योग आहेत. तुमच्याही राशीला येत्या काळात धनलाभ होणार का हे पाहूया..

बुधादित्य राजयोग बनल्याने ‘या’ राशींच्या नशिबाची होणार दिवाळी?

मेष रास (Aries Rashi Bhavishya)
मेष राशीसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी अडकून पडला आहात तिथून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नोकरी व पद बदलाचे संकेत आहेत. कलाविश्वात आपले नाव कमावण्याची संधी मिळू शकते. नोकरदार मंडळींना पगार वाढीचे संकेत आहेतच पण त्यासह तुमचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी अन्य मार्ग मोकळे होऊ शकतात.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
मुळात कन्या राशीतच बुधादित्य राजयोग निर्माण होणार असल्याने कन्या रास तर या पुढील काळात प्रगतीच्या व श्रीमंतीच्या सर्वोच्च स्थानी असू शकते. ऑक्टोबरच्या संपूर्ण महिन्यात व्यवसाय व कामात प्रचंड मोठा धनलाभ होण्याचे संकेत आहेत. या आर्थिक फायद्यांमुळे तुमची अनेक कोडी सुटतील. आयुष्य सुकर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुमच्या आई वडिलांच्या आरोग्याकडे मात्र थोडं बारकाईने लक्ष द्यावं लागेल. भागीदारीच्या कामात फायद्याची चिन्हे आहेत.

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)
बुध व सूर्याच्या युतीच शुभ लाभ धनु राशीत सुद्धा दिसून येईल. या काळात धनाची आवक वाढेल. नशिबाचे तारे आणखी उजळू लागतील. नोकरदारांना सहकाऱ्यांचा पाठिंबा लाभल्याने अडचणी दूर होऊ शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वात या काळात खूप महत्त्वाचे बदल होण्याची चिन्हे आहेत. आत्मविश्वास वाढू शकतो आणि सर्वात मुख्य म्हणजे तुम्ही संयमी राहण्यावर भर देऊ शकता. शेअर बाजार व बँकांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ लाभदायक सिद्ध होऊ शकते.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
सिंह ही सूर्याच्या स्वामित्वाची रास मानली जाते त्यामुळे सूर्याच्या युतीचा थेट प्रभाव या राशीवर सुद्धा दिसून येऊ शकतो. ऑक्टोबर मध्ये तुम्हाला स्त्री रूपातून लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. म्हणजेच तुमची, आई, पत्नी, बहीण या सगळ्यांची साथ तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. या काळात तुम्ही स्वतःसह इतरांच्या आयुष्याची स्थिती सुधारण्यावर सुद्धा भर द्यायला हवा.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
वृषभ राशीच्या मंडळींसाठी गुंतवणूक व बचत हे दोन खांब प्रगतीच्या शिखरावर चढून जाण्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. अधिकाधिक बचतीवर भर द्या पण त्यासह मिळकतीचा काही भाग गुंतवायला सुद्धा सुरुवात करा. तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टीतून अडचण व तोटा सहन करत आला आहात त्याच गोष्टीतून अचानक धनलाभ सुद्धा होण्याची चिन्हे आहेत. वैवाहिक आयुष्य सुद्धा सुखकर होऊ शकते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *