शेगावचे गजानन महाराज यांचा आज रोजी प्रकट दिन आहे. गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र 23 फेब्रुवारी 1878 मध्ये त्यांचे प्रथम दर्शन झाले. त्या दिवशी माघ वद्य सप्तमी होती. बुलढाणा मधील शेगाव येथे महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले, अशी आख्यायिका आहे.
तेव्हापासून माघ वद्य सप्तमी दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी शेगावच्या गजानन मंदिरात मोठा उत्सव असतो. चरण पादुका पूजन, पालखी असे विधी पार पडतात. यानिमित्ताने देशभरातून लाखो भक्त मंदिरात दर्शनासाठी येतात.
23 फेब्रुवारी बुधवारचा दिवस आणि या दिवशी श्री गजानन महाराजांचा 144 वा प्रकट दिन आपण साजरा करत आहोत. त्यामुळे या दिवशी गजानन महाराजांना प्रसन्न करण्यासाठी काही मंत्राचा जप आपण अवश्य करा. पहिली गोष्ट तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं आणि शुचिर्भूत व्हावे.
शुचिर्भूत म्हणजे स्वच्छ स्ना न करावं आणि देवपूजा करावी आणि मग त्यानंतर ज्यांना शक्य असेल, त्यांनी श्री गजानन महाराजांची पूजा करावी, पोथी वाचन करावं, पारायण करावं किंवा अनुष्ठान करावं.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये ज्याप्रकारे उल्लेख आहे, त्यानुसार श्री गजानन महाराजांच्या उपासनेसाठी सर्वोत्तम दिवस हे नवमी, दशमी आणि एकादशी किंवा दशमी, एकादशी आणि द्वादशी हे मानले जातात. त्या सोबतच श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनी सुद्धा त्यांची केलेली सेवा ही खूप लवकर त्याचं फळ हे आपणास खूप लवकर प्राप्त होतं. या दिवशी ज्यांना शक्य नाही पारायण करणे अनुष्ठान करणे शक्य नाही किंवा अनुष्ठान करणे शक्य नाही.
तर ज्यांना या सर्व गोष्टी करणं शक्य नाही अशांनी केवळ रुद्राक्षाच्या माळेवर किंवा मोत्याच्या माळी वर ” गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते”, या महामंत्राचा, या गजानन महाराजांच्या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा. मग त्यामध्ये
आपण 1 माळ किंवा 11 माळ, 21 माळ जितके शक्य आहे तितक्या माळ जप करावा. याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व करत असताना आपण संकल्प सोडला. मात्र विसरू नका संकल्प म्हणजे तुम्ही हे सर्व का करत आहात आणि कशासाठी करत आहात.
तर तुमची एखादी इच्छा अपूर्ण एखाद्या दुःखातून वेदनेतून संकटातून तुम्हाला मुक्ती हवी आहे का?, हे गजानन महाराजांना सांगायला मात्र विसरू नका. जेणेकरून आपला हा संकल्प गजानन महाराज नक्की त्याची पूर्तता करतील. तर आपणास या गोष्टी शक्य असल्यास नक्कीच कराव्यात. गजानन महाराजांच्या 144 प्रकट दिनी त्याच्या गोष्टी आपण नक्की करा, सत्कर्म करा गोरगरिबांची सेवा करा आणि दानधर्म करा या सर्व गजानन महाराजांचा नक्कीच प्रसन्न करवतील. ।।गण गण गणात बोते।।
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!