मित्रांनो, आपण श्री स्वामीं महाराजाची एक विशेष सेवा केल्याने, विशेष लाभ आपल्या मनोकामना पूर्ण होतात. पण आपण प्रत्येक दिवशी श्री स्वामींची विशेष सेवा करावी, तुम्ही कोणतीही रोजची सेवा करत असाल, त्यामध्ये तुम्ही विशेष सेवेमध्ये तुम्हाला एका विशेष मंत्राचा जप करायचा असतो आणि हा मंत्र जप फक्त 21 वेळेस करायचा असतो.
याचबरोबर तुमच्या घरातील कोणीही यामध्ये घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी किंवा लहान मुलं असे कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकता. आज 25 एप्रिल सोमवारचा दिवस आला आहे आणि हा दिवस भगवान महादेवाचा मानला जातो. आपण प्रत्येक दिवशी स्वामी महाराजांची विशेष सेवा करायची आहे. याचबरोबर आपण नेहमीच स्वामीची एक विशेष सेवा किंवा पुजा करीत असतो.
आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन तुमच्या देवघरासमोर म्हणजे श्री स्वामींसमोर बसायचा आहे. मग यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे आणि मग आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना प्रार्थना करायची.
सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच आरोग्या साठी, शांततेसाठी त्यानंतर आपले संकट आणि समस्या, अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मग त्यानंतर झाल्यानंतर हात जोडूनच तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे, हा मंत्र काही असा आहे की,
ओम चिंतप्रशाताय नमः, ओम चिंतप्रशाताय नमः हा मंत्र जप तुम्हाला फक्त 21 वेळीच करायचा आहे. 21 पेक्षा कमी नाही किंवा 21 पेक्षा जास्त नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका. हा मंत्रजप अगदी सावकाश पणे करा आणि मंत्र जप हा मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने करा, कारण विश्वासाने केलेली प्रत्येक सेवा फलदायी असते. तर या सेवेत सहभागी व्हा आणि मंत्र जप नक्की करा.
येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासां वर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं हे पेज लाइक करा तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शे’अर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा धन्यवाद.