3 एप्रिल स्वामींचा प्रकट दिन, स्वामींना प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय. श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो जसे आपण आपला जन्म दिवस साजरा करतो तसेच स्वामी भक्त स्वामींचा प्रकट दिवस साजरा करतात. आपण सर्व स्वामींचे भक्त आहोत त्यामुळे स्वामींचा प्रकट दिवस साजरा करायला हवा. आपण जसे इतर दिवस आनंदाने साजरे करतो तसे आजचा स्वामींचा प्रकट दिवस साजरा करावा. स्वामींचा प्रकट दिवस साजरा करण्यासाठी काही मोठी गोष्ट काण्याची गरज नाही. स्वामी समर्थ महाराज यांना मनपासून कोणतीही गोष्ट केली कि ती स्वामी समर्थ महाराजां खुप आवडते. त्यामळे ते आपल्यला चागले आशीर्वाद देतात.

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशादायक, आश्वासक आणि सकारात्मकता प्रदान करणारा गुरुमंत्र देणारे स्वामी समर्थ महाराज. चैत्र वद्य तृतीयेला स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली. स्वामी समर्थ महाराज भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे.

मित्रांनो स्वामी समर्थ महाराच यांचा प्रकट दिवस साजरा करण्यसाठी कोणतीही मोठी गोष्ट करण्याची गरज नाही साध्य पद्धतीने स्वामींचा प्रकट दिवस साजरा करावा. काही तरी संकल्प करून पूर्ण दिवस तो पाळावा किंवा वर्ष भर सुद्धा केला तरी चालेल. एक दिवा पूर्ण दिवस आपल्या देवघरात लून ठेवावा, तो पूर्ण दिवस चालेल याची काळजी घ्यावी, त्यात वरोवर तेल टाकत रहावे जेणेकरून दिवा दिवस भर चालेल. आणि दिवस भर स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे. तसेच काही स्वामी भक्त एक दिवस स्वामी समर्थ महाराजनचे परायण करतात.

स्वामी समर्थ महाराजां एक गोष्ट सर्वात जास्त आवडते ती म्हणजे, स्वामींची भक्ती करताना कोणताही देखावा करूनका तसेच तम्ही केलेल्या सेवे बदल सगळीकडे सांगत बसुंका अशी गोष्ट स्वामींना आवडत नाही, स्वामींची सेवा करणारे भक्त कुठे पण गाजावाजा करत नाही, स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करणारे सेवक मनपासून व निष्ठेने सेवा करत असतात, ते कोणत्याही फळाची अपेक्षा करत नाही.

आशा सेवकांना व भक्तांना स्वामी लगेच प्रसन्न होतात, व त्याची इच्छा पूर्ण करतात आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच प्रकट दिवस त्यानं यांचा आवडता नैवद्य दाखवावा, त्याना पूर्ण पोळी व दूध हा नैवद्य दाखवला तर खुप चागले आहे.

पण या सर्व गोष्टी झाल्याचं पाहिजे असे नाही, पाळी भाजी, भात वरण शुद्ध चालेल. कोणतेही पद्रार्थ मनापसून तसेच भक्ती भावेने करावेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो स्वामींना भक्ती भावेने केलेल्या गोष्टी खुप आवडतात त्या कितीही सध्या असल्या तरी चालतात, त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी जी सेवा करण्याची आहे. ती खुप सोपी आहे.

रोजच्या कामातून तुम्हला जास्त वेळ काढण्याची गरज नाही. फक्त एक ते दोन तास तुम्हला द्याचा आहे. तो सुद्धा तुम्हला सकाळी किंवा संध्याकाळी द्याचा आहे.जसा जमेल तसा. त्याच प्रमाणे पुरष किंवा महिला कोणी सुद्धा असो हि सेवा केली तरी चालेल. फक्त हि सेवा करताना तुम्हला मनापसून आहि श्रद्धेने करायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *