30 एप्रिल वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण, या 3 राशींसाठी वरदान, प्रगतीच प्रगती होईल.

30 एप्रिलच्या मध्यरात्री 12.15 वाजता सूर्यग्रहण होत आहे. हे ग्रहण मेष राशीत होईल. तर याच्या बरोबर पंधरा दिवसांनी म्हणजे १६ मे रोजी चंद्रग्रहण होणार आहे.

ग्रहण २०२२: सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा प्रभाव राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. अशा स्थितीत १५ दिवसांच्या कालावधीत दोन ग्रहणे होणार आहेत. वर्षातील पहिले सूर्यग्रहणआणि नंतर चंद्रग्रहण होईल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिलच्या मध्यरात्री 12:15 ते 01 मेच्या पहाटे 04.07 पर्यंत राहील. हे ग्रहण मेष राशीत होईल. तर यानंतर बरोबर पंधरा दिवसांनी चंद्रग्रहण होणार आहे. 2022 मध्ये पहिले चंद्रग्रहण 16 मे रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण सकाळी 8:59 ते 10:23 पर्यंत असेल.

ज्योतिषांच्या मते ग्रहण हा अशुभ काळ आहे. पण त्याचा राशींवर चांगला आणि वाईट परिणाम होतो. त्याचप्रमाणे आगामी सूर्य आणि चंद्रग्रहणांचा तीन राशींवर विशेष प्रभाव पडू शकतो. या तीन राशी खालीलप्रमाणे आहेत –

मेष : पुढील १५ दिवसांमध्ये होणारी दोन ग्रहणे मेष राशीच्या लोकांसाठी शुभ असू शकतात. नोकरी व्यवसायात प्रगतीची शक्यता दिसून येईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळात मोठा फायदा होणार आहे. यादरम्यान, तुम्ही एखादे नवीन काम सुरू करू शकता,
ज्याचा दीर्घकाळ फायदा होईल.

सिंह : या राशीच्या लोकांवर दोन्ही ग्रहणांचा शुभ परिणाम होऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत असू शकते. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या काळात लहान सहलीची संधी मिळेल. कर्जातून रात्र निघण्याची शक्यता आहे.

धनुः होणारे सूर्य आणि चंद्रग्रहण धनु राशीच्या लोकां साठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला नोकरी व्यवसायात खूप चांगले परिणाम मिळू शकतात. अनेक दिवसांपासून सुरू असलेली पैशांची टंचाई संपुष्टात येऊ शकते. आर्थिक बाजू मजबूत दिसू शकते. तुमचे रखडलेले काम यावेळी पूर्ण होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *