वर्षातील पहिली सोमवती अमावस्या 31 जानेवारीला आणि दुसरी सोमवती अमावस्या 30 मे रोजी वैशाख महिन्यात आहे. तसेचा हिंदू पंचांगानुसार चतुर्दशी ही तिथी 31 जानेवारीला दुपारी 2 वाजून 19 मिनिटांनी पर्यंत आहे आणि त्यानंतर अमावस्या तिथी सुरू होईल.
31 जानेवारी सोमवार या दिवशी सोमवती अमावस्या आलेली आहे. वर्ष 2022 मध्ये एकूण 13 अमावस्या तिथी आलेल्या आहेत, ज्यामध्ये फक्त दोनच सोमवती अमावस्या आलेल्या आहेत. शास्त्रात असं सांगितलं आहे की, सोमवारी काही काळ अमावस्या आली तर ते सोमवती अमावस्या मानली जाते. हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला फार महत्त्व आहे. जेव्हा अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तेव्हा तिचे महत्त्व अधिकच वाढतं.
आपण सोमवती अमावस्येला केले जाणारे काही उपाय बघणार आहोत. तर सोमवती अमावस्येला स्नानाचा फार महत्व आहे,त्यामुळे ही मौनी अमावस्या असल्यामुळे, अंघोळ करतांना जर मौन राहिल्यास तर त्यामुळे हजारो गाई दान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं.
या दिवशी केलेले स्नान, दान आणि तंत्र-मंत्र साधना यांचा अनंत पटींनी आपल्याला मिळत असत. तसेच या दिवशी आपल्या जीवनातील सर्व दुःख समस्यांचा नाश करण्यासाठी तसेच आपल्या मनात जर इच्छा असेल तर ती पुढे होण्यासाठी आपण तर काही उपाय केले, तर ते शीघ्र फलदायी ठरतात.
त्याचबरोबर बरोबर तुमच्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असतील किंवा धनाच्या संबंधित काही समस्या असतील, तर या दिवशी आंघोळ करताना 2 ते 3 वेळा बेलाची पाने स्वतःच्या डोक्यावर ठेवायची आहे आणि डोक्यावर ठेवूनच भगवान शंकराचे नामस्मरण करुन अंघोळ करायची आहे.
आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि तुमच्या आसपास जिथे कुठे शिव मंदिर असेल. त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ मंदिर असेल तिथे जाऊन कच्च्या दुधाने शिवलिं’गाचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना निरंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्रचा करायचा आहे. तसेच भगवान भोलेनाथ त्यांना प्रिय असणारी पांढऱ्या रंगाची फुलं आणि धोत्र्याचे फुल आणि बेलपत्र अर्पण करायचे आहेत.
या वेळी गाईच्या तुपाचा एक दिवस सुद्धा आपल्याला अवश्य लावायचा आहे. याचबरोबर जर या दिवशी तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल, तर तुम्ही घरामध्ये शिवलिंग अभिषेक करू शकता किंवा घरात शिवलिं’ग नसेल तर या दिवशी तुम्ही मातीचा एखाद्या शिवलिं’ग बनवून देखील त्यांना अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर धूप दीप दाखवल्यानंतर भगवान भोलेनाथ पण समोर हात जोडून आपल्याला बसायचा आहे आणि मनातल्या मनात आपली जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ते बोलून दाखवायचे आहे.
तसेच या दिवशी पितरांचे तिथी मानली जात असल्यामुळे, या दिवशी जर तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून तीळ मिश्रण जल पितरांच्या नावाने अर्पण केलं तर यामुळे पितृदोष सुद्धा नाहीसा होतो. आपले पितर आपल्यावर प्रसन्न होऊन आणि त्यांच्या कृपेने प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळतं.
त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जर काही दुःख असेल, काही संकट असेल तर निवारण करण्यासाठी सुद्धा भगवान भोलेची प्रार्थना करायची आहे. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय केलं, तर भगवान भोलेनाथ तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. या सोमवती अमावस्याला तुम्ही यथाशक्ती तांदूळ डाळ, मीठ दान करू शकता.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!