मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक परंपरा चालत आलेले आहेत. शास्त्रामध्ये आपल्याला अनेक गोष्टींची माहिती पहायला मिळते. म्हणजे हिंदू धर्मामध्ये सण उत्सव अगदी मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. आपापसातील मतभेद विसरून आनंदाचे दिवस साजरे करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो आपल्या हिंदू शास्त्रामध्ये प्रत्येक सणाला तसेच प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे.
पौर्णिमा, अमावस्या, एकादशी, महाशिवरात्री अशा अनेक दिवसांना खूपच महत्त्व आहे आणि या दिवशी काही उपाय केले तर त्याचा लाभ आपल्याला मिळत असतो. तर 31 मे बुधवारच्या दिवशी निर्जला एकादशी आलेली आहे आणि ही खूपच मोठी एकादशी मानली जाते. बरेच भक्त या दिवशी उपवास करीत असतात. अगदी काहीही न खाता-पिता अगदी पाणीही न पिता निर्जला व्रत अनेक जण करताना पाहायला मिळतात.
तर मित्रांनो जर तुम्ही या मोठ्या निर्जला एकादशी दिवशी हा जर एक चमत्कारिक उपाय जर केला तर यामुळे तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील, संकटे असतील हे नक्कीच दूर होणार आहेत. तर तुम्ही देखील येणारे या निर्जला एकादशीला हा उपाय आवश्य करा. तर मित्रांनो निर्जला एकादशीच्या दिवशी म्हणजेच बुधवारच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या देवघरामधील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला एक वाटी तांदूळ घ्यायचे आहे.
आणि हे एक वाटी तांदूळ तुम्हाला आपल्या देवघरामध्ये मधोमध ठेवायचे आहे आणि हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून विधिवतपणे त्या तांदळाची पूजा देखील करायची आहे आणि आपले ज्या काही दुःख असतील, अडचणी असतील, संकटे असतील ते दूर करण्याची प्रार्थना करायची आहे.
नंतर ती वाटी दिवसभर रात्रभर तुम्हाला तशीच देवघरांमध्ये ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक जूनला गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे आटोपण झाल्यानंतर ह्या वाटीतील तांदूळ तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये अर्पण करायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या गाईला देखील हे तांदूळ खाऊ घालू शकता किंवा तुम्ही आपल्या छतावर किंवा बालकनी मध्ये पक्षांसाठी हे तांदूळ ठेवू शकता.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद