३६५ दिवसांनी मंगळ-सूर्यदेवाची वृश्चिक राशीत युती; ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? लक्ष्मीच्या कृपेने घरात येऊ शकतो पैसा…

ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. अशातच आता सूर्यदेव आणि मंगळदेव यांची युती होणार आहे. ही युती १७ नोव्हेंबरला वृश्चिक राशीमध्ये होणार आहे. कारण १६ नोव्हेंबरला ग्रहांचा सेनापती मंगळ वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे तर दुसरीकडे सूर्यदेव १७ नोव्हेंबरला वृश्चिक राशीमध्ये गोचर करणार आहेत. त्यामुळे मंगळदेव व सूर्य देवाचा संयोग झाल्याने काही राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. पाहा तुमच्या राशीचा समावेश आहे का यात…

‘या’ राशीवर सूर्य-मंगळाची अपार कृपा?
सिंह राशी
सिंह राशींच्या लोकांवर या काळात सूर्यदेव आणि मंगळदेवाची अपार कृपा राहू शकते. अडलेली कामं मार्गी लागू शकतात. या काळात नशिबाची साथ मिळाल्याने व्यापारात आणि नोकरीमध्ये उन्नती होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. आर्थिक उलाढाल चांगली राहण्याची शक्यता आहे. व्यवहारांमध्ये मोठा फायदा होऊ शकतो.

तूळ राशी
सूर्यदेव आणि मंगळाची युती तूळ राशींच्या मंडळीसाठी लाभदायक ठरु शकते. या लोकांच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी वाढण्याची शक्यता आहे. पैसा आणि करिअरच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मानसिक सुख-शांती मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे.

मीन राशी
सूर्य-मंगळाची या राशीवर विशेष कृपा राहू शकते. अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात या राशीतील लोकांना भरपूर आर्थिक लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीतून मोठा नफाही मिळण्याची शक्यता आहे. या काळात कंपनीकडून चांगला बोनस मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुमची कोणतीही मोठी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. घरातील कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *