५ दिवसांनी शनी व बुध १८० अंशात आमने सामने! ‘या’ ४ राशींची मंडळी नशीब चमकून होऊ शकतात करोडपती..

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी ग्रह गोचर म्हणजेच राशी परिवर्तन करत असतो. शनीचा परिवर्तन वेग हा सर्वात संथ असल्याने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी शनी महाराजांना किमान अडीच वर्षे लागतात. यंदा शनीदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. येत्या ४ नोव्हेंबरला शनी मार्गी सुद्धा होणार आहेत.

तत्पूर्वी येत्या पाच दिवसांनी शनी महाराज व ग्रहांचे राजकुमार बुध देव १८० अंशात आमनेसामने येणार आहेत. १८ सप्टेंबरला जेव्हा अशी स्थिती जुळून येईल तेव्हा चार राशींच्या नशिबात अत्यंत लाभाचे शुभ योग तयार होणार आहेत. शनी- बुध युती या राशींना करोडपती करू शकते अशीही चिन्हे आहेत. तुमची रास यामध्ये समाविष्ट आहे का? आणि असल्यास, तुम्हाला नेमक्या कोणत्या मार्गाने धनप्राप्ती होऊ शकते हे पाहूया ..

गणपती बाप्पा येण्याआधीच शनी-बुध ‘या’ ४ राशींना देतील आशीर्वाद

मेष रास (Aries Rashi Bhavishya)
मेष राशीच्या कुंडलीत शनी व बुध ग्रह आमने सामने आल्याने अनेक रेंगाळलेली कामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. तुमच्या उन्नतीचे कारण तुमच्या आयुष्यातील महिला ठरतील. लक्ष्मीस्वरूप धनलाभासाठी तुम्हाला सरस्वतीचा आशीर्वाद लाभेल म्हणजेच एकार्थी तुमच्या वाणीने तुमचे यश लिहिले जाईल. तुम्हाला शारीरिक त्रास व थकव्यातून सुट्टी मिळेल. कौटुंबिक खेळीमेळीचे वातावरण तुमच्या मनावरील भार कमी करेल. सोने- चांदी खरेदीसाठी उत्तम योग आहे.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
शनी व बुध तुमच्या राशीच्या गोचर कक्षेत सातव्या स्थानावर आमनेसामने येणार आहेत. यामुळे तुमच्या आयुष्यातील कामे सुद्धा सरळ मार्गी लागू शकतात, नोकरदारांना नोकरीबदलाचे संकेत आहेत. आपल्याला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. तुमचा ताण वाढू शकतो पण तरीही एकाअर्थी काहीतरी साध्य केल्याची भावना बळावू शकते. त्यामुळे तुम्ही आनंदी राहू शकता. एखाद्या जुन्या गुंतवणुकीचा किंवा वाडवडिलांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा वाट्याला आल्याने तुम्हाला प्रचंड मोठा धनलाभ होऊ शकतो.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
मिथुन राशीला वर्षाच्या पहिल्याच महिन्यात शनीच्या साडेसातीतून सुटका मिळाल्याने ही आताची सर्वात नशीबवान रास म्हणता येईल. मिथुन राशीच्या कलाकार मंडळींना या काळात विशेष लाभ होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या एखाद्या कलाकृतीला (लेखन, साहित्य, नृत्य, चित्र,) मान प्राप्त होईल ज्यातून तुमचे आर्थिक स्रोत वाढतील. एकाअर्थी तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्याचा हा कालावधी असणार आहे. तुम्हाला बंधने मोडावी लागतील आणि हे करताना आपल्या जवळच्या माणसांची मने जपावी लागतील.

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
शनी व बुध ग्रहाची दृष्टी तुमच्या राशीच्या गोचर कक्षेत सातव्या स्थानी पडत आहे. हे भाग्य स्थान असल्याने या काळात तुम्हाला नशिबाची साथ लाभू शकते. याशिवाय तुम्ही एखाद्यासाठी फायद्याचे काम करू शकता असेही दिसत आहे. तुमच्यामुळे इतरांना शुद्ध आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणेशोत्सव व त्यापुढील एक आठवडा अत्यंत महत्त्वाचा कालावधी ठरणार आहे. गणित व आकडेमोडीशी संबंधित कामांमध्ये तज्ज्ञांची मदत घ्या. तुम्हाला घराच्या खरेदीचे सुद्धा योग आहेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *