भगवंताच्या पूजेतील अतिशय पवित्र असलेल्या पाच वस्तूंचे अपावित्र्य, तूम्हाला माहिती आहे का?

उच्छिष्टं शिवनिर्माल्यं, वमनं शवकर्पटम। काकविष्टा ते पञ्चैते, पवित्राति मनोहरा।।

१. उच्छिष्ट – गाईचे दूध – गाईचे दूध सर्वप्रथम तिचं वासरू पिऊन उष्ट करते, तरीही ते पवित्र असते आणि शिवाच्या पिंडीवर त्याच दुधाचा अभिषेक केला जातो.

२. शिव निर्माल्य – गंगाजल – गंगेचं अवतरण स्वर्गातून सर्वप्रथम थेट भगवान शंकराच्या मस्तकावर झालं. नियमाप्रमाणे शंकराच्या मस्तकावर वाहिलेली प्रत्येक वस्तू निर्माल्य समजली जाते. परंतु गंगाजल हे पवित्र समजले जाते.

३. वमन – उलटी – मधमाशी जेव्हा फुलाचा रस तोंडात धरून पोळ्यावर येते तेव्हा ती त्यात आपल्या मुखातील तो रस मधाच्या स्वरूपात ओकते. हाच मध पवित्र कार्यासाठी उपयोगात आणला जातो.

४. शव कर्पटम् – रेशमी वस्त्र – धार्मिक कार्ये संपन्न करण्यासाठी त्या ठिकाणी पवित्रता आवश्यक असते. रेशमी वस्त्राला पवित्र मानल्या गेलेलं आहे. परंतु रेशमाचे वस्त्र तयार करण्यासाठी रेशमाच्या किड्यांना उकळत्या पाण्यात टाकलं जातं आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो आणि त्यानंतर आपल्याला रेशीम मिळते. म्हणजे रेशमाच्या किड्यांच्या शवाचं कर्पट होत असते. पण तरी ते पवित्र असते.

५. काक विष्टा – कावळ्याचे मल – कावळा पिंपळाच्या झाडाची फळे खातो आणि त्यातून त्या झाडाच्या बिया आपल्या विष्टेच्या माध्यमातून इकडे तिकडे पसरवितो. यांच बियांपासून पिंपळाची झाडं उगवतात. आपल्याला माहितच असेल की पिंपळाची झाडे मुद्दाम कुणी लावत नाहीत, ती काकविष्टेतून बाहेर पडलेल्या पिंपळ फळाच्या बियांपासूनच उगवतात, पण तरी पिंपळ वृक्ष पवित्र असतो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं ध श्र द्धे ला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *