अतिसामान्यतलं असामान्यत्व. जर कुठेही नाव नं कमावलेल्या तुम्ही सर्वसामान्य महिला असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.
सुप्रसिद्ध महिलांवर लिहीणारे तर शेकडो आहेत. पण माझ्या मते. घराघरात राबणारी, सर्वांची नि:स्वार्थ सेवा करणारी सामान्य घरातली एक सामान्य स्त्री हि खरोखर एखाद्या क्षेत्रात काम करून नाव कमावणाऱ्या प्रसिद्ध महिले पेक्षा काकणभर ही कमी नाही.
कारण रोज उठुन माहीत आहे. तीच साडी घालायचीये. तीच भांडी घासायचीत. तेच कपडे. तेच केर काढणं. सगळं सगळं तेच असणार आहे. पण तरीही नव्या जोमाने सगळं पुनश्च उत्साहाने करणारी माझी सखी. माझ्या मनातली खरी नायिका आहे.
भारतातल्या लाखो बायका अजुनही हेच जीवन जगतात, असंच…
कुठुन आणतात आंतरीक उर्मी? मानसिक बळ, सकारात्मकता?
माहीत नाही. कित्येक जणींचं तर माहेरही धड नसतं आणि सासरही. पण तरीही, चालुच असतं सगळं. एक अतिसामान्य महिला, म्हणुनच घराघरातल्य स्त्रीशी खुप जास्त कनेक्ट होते….
कुठंही गेलं कि मला घर बघायचं नसतं. ते घर नीटनेटके ठेवताना खंडीभर कष्ट करणारी माझी मैत्रीण बघायची असते. तिची वेगवेगळी रुपं बघायची असतात.
तिला दिसत नसतात का हो ? शेजार पाजारच्या बायका आॉफिसला जातात. छान पैसे कमावतात. पाहीजे तशी हौसमौज करतात. मग कधीतरी प्रत्येकीला हे वाटतच असणार कि मी का नाही हे करु शकत. खुपदा वाईटही वाटत असणार. पण बोलणार काय आणि कुठे. ?
जबाबदाऱ्यांची वाट इतकी कठीण आणि क्लीष्ट असते कि कटता कटत नाही. माधुरीचं सौंदर्य, शिल्पा शेट्टीची फिगर, अमकीची हुशारी, तमकीचं ज्ञान यांचं सगळे कौतुक करतात.
पण माझ्या मते वर्षानुवर्षे घरातलं काम करुन, भेगाळलेले, कडक हात सगळ्यात सुंदर आहेत. सणवार असलं कि तासंतास गॅस जवळ उभं राहुन घामाघुम झालेली घराघरातली स्त्री सगळ्यात सुंदर आहे.
स्वनियोजन करुन घराचं व्यवस्थापन करणारी न शिकलेली आपली आई आपली आज्जी जगातल्या सगळ्यात हुशार बायका आहेत.प्रत्येक भारतीय घरातली प्रथा, परंपरा, सणवार, चालीरी तींचा डोंगर लिलया सर करणारी आणि आपल्या मुलीला जिद्दीने शिकायला कायम पाठिंबा देणारी माझी प्रत्येक घरातली मैत्रिण सुंदर आहे आणि बुद्धीमानही.
खुप खुप अभिमान आहे मला तुमच्या सगळ्यांचा आणि कायम राहील. स्वतःला सामान्य समजु नका. तुम्ही तर असामान्य आहात. आजचं हे प्रथम पुष्प तुमच्यासाठी, गोड मानून घ्या.
टिप – तर मैत्रिणिंनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!