चैत्र कृष्णपक्ष शततारका नक्षत्र 26 एप्रिल रोजी मंगळ वार वरूथिनी एकादशी आहे. 26 एप्रिल रोजी रात्री 1 वाजून 36 मिनिटांनी एकादशीला सुरुवात होणार असून 27 एप्रिल रोजी रात्री 12 वाजून 46 मिनिटांनी एकादशी समाप्त होणार आहे. एकादशीपासून पुढे येणारा काळ हा काही खास राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येण्याची शक्यता आहेत.
हिंदू धर्मामध्ये सर्व व्रतामध्ये एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची उपासना केली जाते. परंतु वरूथिनी एकादशीला अतिशय कल्याणकारी एकादशी मानण्यात आले आहे. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची भक्ती आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पापांचा नाश होतो आणि सोबतच मोक्षाची प्राप्ती देखील होते.
हिंदू धर्मामध्ये एकादशीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. या दिवसाची भक्तगण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. भजन-कीर्तन आणि ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आणि विशेष मानला जातो. भगवान विष्णूची पूजा भक्ती करण्यासाठी किंवा महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाची पूजा करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात, एक शुक्ल पक्षातील आणि दुसरी कृष्ण पक्षात येते.
मेष राशी: एकादशीपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात मांगल्याची दिवस घेऊन येणार आहेत. भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनात अतिशय शुभ घडामोडी घडवून आणू शकतो. या काळात आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवून बुद्धी आणि विवेकाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. हा काळ आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहेत त्यात आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते.
मिथुन राशी: एकादशीपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारात मोठे यश प्राप्त होईल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ उत्तम आहे. समाजात मानसन्मानामध्ये वाढ होईल. मंगल कार्याची सुरुवात होणार आहे. मांगल्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. या काळात व्यसनापासून आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक लाभ होईल. नवीन ओळखी वाढत असल्यामुळे त्याचा लाभ आपल्याला कार्यक्षेत्रात मिळणार आहे.
कर्क राशी: या काळात जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. जीवनात प्रगतीचे दिवस आता आपल्या वाट्याला येणार आहे. घरातील लोकांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. कार्यक्षेत्रातून आर्थिक मदत वाढणार आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये मोठी वाढ दिसून येईल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे. आर्थिक समस्या आता समाप्त होतील.
कन्या राशी: कन्या राशिसाठी हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. आर्थिक क्षमता आणखीन मजबूत बनणार आहे. माता लक्ष्मी आपल्या पाठीशी राहणार आहे. कौटुंबिक जीवनात सर्व सुखाची प्राप्ती होईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्र जिद्द आणि चिकाटीने काम करण्याचे गरज आहे. पण या काळात आपल्याला म्हणून मन लावून काम करण्याची आवश्यकता आहे. जिद्द आणि चिकाटीने काम करावे लागतील, तरच आपल्याला यश प्राप्त होऊ शकते.
तुळ राशी: तुमच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमुन येतील. जिद्द आणि चिकाटीने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे एका सकारात्मक विचाराने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. व्यवसायातून मोठा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. व्यापारी वर्गासाठी काळाला अनुकूल ठरणार आहे. आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्रगती समाधानकारक होणार आहे.
वृश्चिक राशि : वृश्चिक राशीवर माता लक्ष्मीची विशेष प्रभाव राहणार आहे आणि आर्थिक दृष्टीने काळ अनुकूल राहणार आहे. मानसिक ताणतणाव आता कमी होणार आहे. नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. नवीन कामाची सुरूवात करणार आहात. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. आपल्या जीवनात अतिशय शुभकार्याची सुरुवात होणार आहे. जे काम हातात घ्याल ते आपल्याला यश प्राप्त होऊ शकते.
कुंभ राशी : एकादशीपासून पुढे येणारा काळ कुंभ राशि च्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनात प्रगतीचे दिवस येणार आहेत. मानसिक सुख-शांतीमध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात मोठ्या व्यक्ती मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. संसारी जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. आता भगवान विष्णूची कृपा आपल्याला पडणार आहे. वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होईल. करिअरमध्ये चांगली प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. या काळात जिद्द आणि चिकाटीने काम केल्यास यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.