स्वामी म्हणतात, आयुष्या त भरपुर प्रगती व्हावी असे वाटत असेल, तर या 5 चूका करायचे टाळा.

मित्रांनो, आम्ही तुम्हाला अश्या पाच गोष्टी सांगणार आहे जे श्रीमंत आणि यशस्वी लोक कधीच करत नाही पण सर्वसामान्य माणूस नेहमी ही चूक करत असतो तर त्या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीत ते खालीलप्रमाणे जाणून घेवूयात.

सुरुवातीला सांगतो आम्हाला कुणाच्या ही भावना दुखवायच्या नाहीत किंवा कोणाला कमी लेखायचे नाही पण आपल्या सर्वांची प्रगती व्हावी हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे त्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या लेखाद्वारे.

प्रगती वाटेवर असताना या ५ चुका करू नका – तुलना करणे बंद करा : आपली तुलना दुसऱ्या दुसऱ्यांबरोबर कधीच करू नकात. मित्रांनो, आजच्या काळामध्ये आपल्याला अनेक दुःखाचे कारण आपनस्वता:हा असतोत. कारण दुसरी व्यक्ति एवढी आनंदी कशी आहे हे आपल्या दुखा:चे कारण आहे.

आपण सतत फेसबुक वर व्हाट्सअप वर आपल्या मित्रांचे किंवा मैत्रिणींचे चांगले चांगले फोटो बघून आपल्याला असे वाटते की मी माझ्या आयुष्यातइतके आनंदी का नाही. आणि अशी तुलना आपण सातत्यानेस्वता:ची दुसर्‍या व्यक्ति सोबत करत असतोत.

याच गोष्टीचा विरोध आपण स्वता:शी करत असतो आणि याचा विचार करून आपण दुःखी होत असतो.एवढी गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही व्यक्तीची वास्तवता फक्त त्याला माहिती असते आपल्याला फक्त भारी देखावा दिसतो.

आणि आपण आपली बरोबरी समोरच्या सोबत करत असतोत. हा सर्व दिखावा असतो फक्त समोरच्याला दाखवण्यासाठी. माझा एक मित्र नेहमी आपल्या बायकोबरोबर रोज वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो स्टेटसला लावत असतो. तेव्हा मी त्याला विचारलं तुम्ही किती आनंदी आहात तुमच्या संसारांमध्ये.

तेव्हा तो मला म्हणाला अरे कसलं काय स्टेटस ठेवले नाही तर बायको रोज भांडण करते. त्यामुळे मला जबरदस्ती ठेवावे लागते. मित्रांनो, या उदाहरणावरून मला काय म्हणायचे ते समजून घ्या.

कोणावरही अवलंबून राहू नका : शक्यतो होईल तेवढे कोणावरही अवलंबून राहू नका. मित्रांनो, मी अनेक वेळा पाहिला आहे की लोक आपल्या कामांसाठी नेहमी कोणावर ना कोणावर तरी अवलंबून राहतात. अडचणी च्या वेळी मदत मागणे वेगळी गोष्ट आहे पण नेहमी आपल्या कामांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणे हे अतिशय चुकीच आहे.

समोच्यावर जास्त अवलंबून राहिल्याने अशाने तुमचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे शक्यतो कोणतेही काम स्वतः पूर्ण करायची सवय लावा. याने तुमचा ही आत्मविश्वास निर्माण होईल. जे लोकांची छोटे-छोटे कामांची जबाबदारी घेतात ते पुढे जाऊन आयुष्यामध्ये कितीही मोठे काम आले तरीते सहज पार करु शकतात.

निंदा करणे टाळा : दुसऱ्याची निंदा होत असताना त्याचा आनंद घेणे. मित्रांनो, आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते की कोणाची निंदा करायची नाही. कोणाबद्दल वाईट बोलायचे नाही पण अजून एक महत्त्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे कोणाची निंदा होत असताना त्याच्या मध्ये इंटरेस्ट दाखवणे किंवा त्या बोलण्याचा आनंद घेणे हेसुद्धा चुकीचे आहे.

तुम्ही जर अशा निंदानालस्ती त्या गप्पांमध्ये सहभाग जरी घेत असाल तरी तुम्ही समोरच्याची निंदा करता असे ठरते. तुमचे मन दुषित होते त्यामुळे ज्या लोकांना सातत्याने लोकांची निंदा करायची सवय आहे अशा लोकांपासून लांब राहिलेलेच बरे.कारण यशस्वी लोक अशा गप्पांमधे कधीही सहभाग घेत नाही कारण त्यांच्याकडे अशा फालतू गप्पा ठोकण्यासाठी वेळच नसतो ते सतत आपली प्रगती कशी होईल ह्या गोष्टींवर काम करत असतात.

चुकीच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करु नका : नकोत्या गोष्टीवर फोकस करणे म्हणजे लक्ष केंद्रित करणे थांबा. मित्रांनो, निसर्गाचा नियम आहे आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो त्याच्या मध्ये वाढ होत जाते. त्यामुळे तुम्हाला जे आयुष्यामध्ये हवे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा त्याच्याबद्दल बोला.

उदा. मला आयुष्यात दुःख नकोय, मला आयुष्यात संकटे नकोय, महागाई खूप वाढली आहे वगैरे वगैरे.. तुम्ही काय करत आहात संकटे, दुःख, महागाई या गोष्टींवर लक्ष केंद्रित करताय.यापेक्षा तुम्ही आनंद कस राहता येतील याचा विचार करा.

मला सुखी राहायचे आहे माझी उत्पन्न कसे वाढेल अशा प्रकारे तुम्ही विचारांमध्ये बदल कराल. तेव्हा तुमचा फोकसपॉझिटिव गोष्टींवर जाईल आणि मग निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी होयला सुरुवात होईल.

भूतकाळात घडलेल्या गोष्टी काढत बसू नका – भूतकाळा त घडून गेलेल्या गोष्टी जास्त उगाळत बसू नका. मित्रांनो, तुमच्या बरोबर जर भूत काळामध्ये काही दुःखद घटना घडली असेल तर त्याच्याबद्दल सारखा सारखा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका.

मला मान्य आहे हे जेवढे बोलायला सोपे आहे तेवढे करायला अवघड आहे पण घडून गेलेल्या गोष्टींवर दुःख उगाळून काही सुद्धाहोणार नाही त्यामुळे जे काही झाले त्याची शिकवण घ्या आणि भविष्याचा विचार करा.

जी व्यक्ति सारखे स्वता:चेरडगाणेगात बसतात अशा लोकांपासून सुद्धा लांब रहा. कारण ह्या जगात प्रत्येकाला स्वतःचे दुःख आणि समस्या आहेत आणि जो माणूस सतत गाणे गातो तो स्वतःचे नुकसान करून घेतो. कारण तूम्ही नेहमी भूतकाळ मध्ये अडकलेला असतात. ज्याच्या मनामध्ये सतत भूतकाळाचे विचार असतात त्याचे भविष्यामध्ये काही सार्थकहोत नाही.

मित्रांनो, ह्या होत्या त्या पाच महत्त्वाच्या गोष्टी या श्रीमंत आणि यशस्वी लोक कधीच करत नाही. पण सर्वसामान्य माणूस नेहमी करत असतो. ह्या पाच मुद्द्यांपैकी तुम्हाला कोणता मुद्दा आवडला मला कमेंट मध्ये नक्की सांगा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *