आयुष्यात कधीही तुमच्यावर वाईट वेळ येऊ नये असे वाटत असेल तर, फक्त ही 5 कामे करा.

आयुष्यामध्ये वाईट वेळ, संकटं आणि दुःख कधीही सांगून येत नाहीत, तथा येणारच नाही हे कसं शक्य आहे नाही का.? आपलं हे आयुष्य म्हटले की सुख दुःख येत राहणारच. तसं तर भलेही प्रत्येकाची इच्छा असते की, आपल्या आयुष्यात दुःख येऊच नये. सुख दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्याचे अविभाज्य अंग आहे. कारण येणारी वेळ आपल्या हातात नसते. पण चाणक्य म्हणतात जर तुम्ही ही 5 कामे करत राहिलात तर तुमच्या आयुष्यात खूप कमी दुःख येईल किंवा आले तरी ते जास्त काळ टिकणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात ती 5 कामे कोणती आहेत.

पहिले काम आहे परमेश्वराची प्रार्थना करत राहा. कारण परमेश्वरावरचा विश्वास तुमच्यामध्ये जबरदस्त आत्म विश्वास निर्माण करतो. आता काही जण म्हणतात आमचा देवावर विश्वास नाही. पण तुमच्या या ब्रम्हांडावर तर विश्वास असेल या निसर्गावर तर विश्वास असेल आपल्याला निर्माण करणारी एक शक्ती आहे.

या शक्तीवर तर विश्वास असेल, चाणक्य म्हणतात परमेश्वरावरचा दृढ विश्वास तुम्हाला कधीच हार म्हणू देत नाही. तुमच्यामध्ये साहस निर्माण करतो. त्यामुळे आयुष्यात कितीही वाईट वेळ आली तरी तुम्ही धैर्याने त्याला सामोरे जाता आणि त्याच्यावर मात करता. म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा त्याची प्रार्थना करत राहा भक्ती करत राहा.

दुसरे काम आहे दान धर्म करत राहा गरिबी येणार नाही. गरिबीतून सुटका पाहिजे असेल तर चाणक्य सांगतात तुमच्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करत राहा. दान केल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती होते जे तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाते. दान केल्याने घरात सुख शांती समाधान वास करते.

कारण निसर्गाचा नियम आहे अशी प्रतिक्रिया तुम्ही जे काही कराल ते अनेक पटीने तुमच्याकडे परत येणार आहे. दानधर्म केल्याने मनःशांती लाभते. ही होती पाच कामे जी चाणक्याने आयुष्यात वाईट वेळ न येण्यासाठी किंवा वाईट वेळेला सामोरे जाण्यासाठी सांगितलेले आहेत.

तिसरे काम आहे कोणत्याही मूर्खाला ज्ञान द्यायचा प्रयत्न करू नका. चाणक्य म्हणतात मूर्ख व्यक्तीला ज्ञान देणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. कारण मूर्ख लोक कधीच कोणाचे ऐकत नाहीत. उलट आपण काही सांगायला गेलो की ते आपल्यावरच उलटतात, आपल्याशी वाद घालतात आणि अशामुळे आपण दुःखी होतो, आपल्याला त्रास होतो.

कधी कधी हे मूर्ख लोक आपल्या प्रगतीवर जळतात आणि आपल्याला इजा पोहचवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मूर्ख लोकांच्या नादी न लागलेलेच बरे. कारण अशा लोकांच्या नादी लागल्यामुळे आपला वेळ सुद्धा वाया जातो आणि आपल्याला मनस्ताप होतो तो वेगळाच. त्यामुळे कोणत्याही मूर्ख व्यक्तीला कसलेही ज्ञान पाजळू नका किंवा ज्ञान द्यायचा प्रयत्नही करू नका.

चौथे काम आहे सर्वांबरोबर विनम्रतेने रहा सभ्यतेने रहा. चाणक्य म्हणतात या जगात प्रत्येक व्यक्ती उपयुक्त आहे. त्यामुळे कोणती व्यक्ती कधी आपल्या कामाला येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांबरोबर विनम्रतेने वागा. सर्वांबरोबर चांगले संबंध ठेवा. तर नम्रता हा सर्व श्रेष्ठ गुण आहे. नम्र व्यक्तीला या जगात सर्व काही शक्य आहे.

जेव्हा कधी आपल्या आयुष्यात वाईट वेळ येते, संकटे येतात तेव्हा हेच जवळची व्यक्ती आपल्या मदतीला धावून येतात. मला कोणाची गरज नाही मी कोणावर अवलंबून अशी अहंकारी वृत्ती ठेवू नका. कारण वेळ ही सर्वांवर येते. सर्वांबरोबर नम्रपणे वागल्यामुळे आपले नातेसंबंध दृढ होतात आणि कठीण काळात हीच नाती आपल्या कामाला येतात.

पाचवे काम आहे जिथे कुठे ज्ञान मिळेल ते मिळवत राहा आणि आयुष्यात नेहमी ज्ञानाला महत्त्व द्या. चाणक्य म्हणतात आपल्या सर्व दुःखांचे कारण एकच ते म्हणजे अज्ञान. कारण आपल्याकडे असलेले ज्ञानच आपल्याला दुःखातून वाचवते. तुमच्या ज्ञानामुळेच तुम्हाला समाजात मान मिळतो.

त्यामुळे ज्ञान मिळविण्यात कधीही कमीपणा करू नका. फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. ज्ञान हे असे शस्त्र आहे जे तुम्हाला कोणत्याही संकटातून दुःखातून सहज बाहेर यायला मदत करते. त्यामुळे आयुष्यात ज्ञानाला महत्त्व द्या.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *