नमस्कार मित्रांनो, या पृथ्वीतलावर प्रत्येक प्राण्याचा काही न काही अंशी संबंध हा कोणत्या ना कोणत्या देवतेशी जोडलेला आहे. म्हणूनच आज आपण मुंगूस विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. मुंगूसाला एक शुभ प्राणी मानले जाते. मुंगूस दिसला म्हणणे साक्षात प्रभू विष्णूचे दर्शन झाल्यासारखे आहे.
आपल्या सनातन हिंदु धर्मात बऱ्याचशा प्राण्यांच्या दिसण्याबद्दल शुभ संकेत आणि अशुभ संकेत सांगितलेले आहेत. आपण मांजर, गाय, कावळा, मासा, कासव अशे कितीतरी प्राणी दिसले की आपण त्याचा संबंध शुभ आणि अशुभ संकेताशी तथा देवांशी जोडतो, व ते खरेही आहे.
मुंगूस दृष्टीस पडले की सात दिवसाच्या आत आपल्याला धनलाभही होतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला पैसे जरूर मिळतात. जेव्हा आपण घराबाहेर काहीतरी कामा निमित्त निघतो,आणि आपल्याला जर उजव्या बाजूला मुंगूस दिसले तर हे तर खूपच शुभ असते.
ज्या दिवशी मुंगूस आपल्या दृष्टीस पडणार त्या दिवशी असे समजावे की आजचा दिवस आपल्याला शुभ जाणार आहे. तसेच आपण जे काही कार्य आजच्या दिवशी करणार आहोत त्यात आपल्याला यश व सफलताच मिळणार. या बद्दल अजून बऱ्याच संकेतांची यादी बनू शकते.
ज्या प्राणी किंवा वनस्पती कडे पाहून आपले मन प्रसन्न होते, आपल्याला आनंद होतो, तो प्राणी किंव्हा वनस्पती आपल्यासाठी शुभ असतात. तर ज्या प्राणी किंवा वनस्पती कडे पाहून आपल्याला भीती वाटते तो प्राणी किंवा वनस्पती आपल्यासाठी अशुभ असतात. मुंगूस व साप यां दोघांचे भांडण दिसणे देखील शुभ असते. ज्या घरात मुंगूस असते तिथे साक्षात श्री विष्णूंचा वास असतो. आज आपण असाच एक मुंगूसचा उपाय बघणार आहोत.
आपल्या शास्त्रामध्ये शकुन अपशकुन मुंगूस बद्दल शुभ संकेत व त्यांच्या उपयांबद्धल माहिती दिली आहे. प्रत्येक उपाय करताना त्यात काही ना काही त्या वनस्पती चा किंवा प्राण्याचा संबंध असतोच. जर आपण कुठे बाहेर जायला निघालो आहोत आणि अचानक आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस गेल्या नंतर ते ज्या ठिकाणांवरून गेले त्या ठिकाणची थोडी माती घेऊन लगेचच घरी परतावे.
घरी येऊन त्या मातीमध्ये आणखी थोडी माती मिसळावी व ती एका वाटीत ठेवावी. ती वाटी देवघरासमोर ठेऊन बाजूला अगरबत्ती तसेच धूप लावावा. जो पर्यंत तो अगरबत्ती किंव्हा धूप जळत नाही तो पर्यंत आपण “ओम नमो नारायण” या मंत्राचा जप करत बसावे. त्या नंतर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो होतो त्या कामाला जावे.
या मुळे काय होईल या उपायाची आपल्याला खूपच सकारात्मक बाजू पहायला मिळेल. आपली अडकलेली कामे मार्गी लागतील. आपली सर्व अडचणी व त्रासापासून आपली सुटका होईल. जी कामे करण्याचा आपण खूप प्रयत्न करत होतो परंतु त्यात अपयशच येत होते, ती कामे ही मार्गी लागतील.
त्यात यशही मिळेल. ज्या काही नकारात्मक गोष्टी घडत होत्या त्यांच परिवर्तन सर्व सकारात्मक गोष्टी मध्ये होईल. नोकरी तथा व्यवसायात फायदा होईल. म्हणजे सर्व बाजुंनी फक्त आणि फक्त सकारात्मक गोष्टीच घडतील.
हा उपाय खरोखरच प्रभावी आहे. आणलेल्या मातीची वाटी आपली इच्छा असेल तो पर्यंत आपण घरात ठेऊ शकतात. त्या नंतर ती माती झाडांच्या कुंडी मध्ये टाकून द्यावी. हा उपाय एकदा नक्की करून पहा आपले जीवन नक्कीच सकारात्मकते कडे जाईल. आयुष्यात सकारात्मक बदल घडवून येईल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!