अहंकाराचा वारा न लागो.. आपल्याकडील लक्ष्मी वाढली की अहंकारही वाढतोच, असे होऊ नये यासाठी करा हे एक काम.

कुणाला रूपाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला पदाचा तर कुणाला सत्तेचा अहंकार. साध्या शब्दात सांगता येईल की अहंकार म्हणजे मद, मस्ती, माज. अहंकारी माणसा जवळ विनम्रता नसते. मी म्हणजे मीच फक्त, हेच त्याच्या नसानसात भरलेलं असतं.

अहंकार’ हा माणसाचा फार मोठा शत्रू. प्रत्येक व्यक्ती अहंकारव्याप्त असते. कुणाला कर्तृत्वाचा अहंवार असतो. अहंकारात अहं म्हणजे मी प्रभावी असतो. व्यक्ती स्व-भोवती फिरते तेव्हा अहंकार पोसला जातो. हा ‘मी’ इतरांना तुच्छ मानू लागतो. एकटा पडतो. माणूस समाज निष्ठ प्राणी आहे. एकटा जगू शकत नाही. ‘मला कोणाची गरज नाही. आमच्याजवळ सारे आहे’ असा अहंकार बाळगणारी माणसं विकृतीच्या जवळ गेलेली असतात

मित्रांनो आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत की, जेव्हा आपल्याकडील लक्ष्मी वाढते म्हणजेच भरपूर पैसा आला, भरपूर संपत्ती आली की आपला अहंकार वाढू नये यासाठी एक विशिष्ट प्रकारची सेवा असते त्याबद्दलची महत्त्वाची माहिती. या माहितीमध्ये काही अख्यायिका तर काही तंतोतंत घटना सांगण्यात आले आहेत.

मित्रांनो गेल्या जन्मी मातासतीने प्रजापती दक्ष राजाच्या पोटी जन्म घेतला होता आणि भगवान शिवाशिही विवाह केला होता. पण प्रजापती राजाला श्रीशंकराचे स्मशानात राहुन त्यांनी जीवन जगणे मान्य नव्हते म्हणून ह्या गोष्टी चा राग मनात ठेवून त्यांनी भगवान शिवाला यज्ञ सोहळ्यात न बोलता त्यांचा अपमान केला त्यावर क्रोधीत होऊन सतीने आत्मदहन केले आणि पुन्हा नवीन जन्म हिमालयाच्या पोटी जन्म घेऊन कठीण तपश्चर्या करून भगवान शिवा बरोबर पुनर्विवाह केला.

यावेळेस माता-पिता आणि बंधू यांनी अत्यंत आदराने शिवपार्वतीला आपल्या घरी ठेवून घेतले त्याची स्मृती म्हणून प्रत्येक घरात हा उत्सव एक महिना साजरा करतात. स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा उत्सव म्हणून याला शितला गौरी असेही म्हणतात.

मित्रांनो महिनाभराच्या या काळामध्ये एक दिवस तिची आरास करून हळदीकुंकू ठेवतात. सर्व फळावर नाना पदार्थ, मिष्ठान्न, भोजन कलिंगड, खरबूज, डाळ, हरभरा ठेवतात. या दिवशी घरातील समृद्धी व्हावी असा या मागचा उद्देश आहे.

तसेच उन्हाळ्यात त्यावर उपाय करणारे विविध पदार्थ येथे सुचविण्यात आलेली आहे. या दिवशी हळदी कुंकवाला आलेल्या महिलांना पूजा करून हातापायांना उष्णता कमी करणाऱ्या चंदनाचा लेप लावतात. त्यामुळे आपले रक्‍ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी उपयोगी ठरते. असे हे व्रत ऋतुचर्या सुद्धा निगडित आहे.

ज्येष्ठ गौरी आपल्या सौभाग्याचे रक्षण व्हावे म्हणून सर्व देव स्त्रियांनी श्री लक्ष्मीची आराधना केली. तेव्हा देवी प्रकट झाली आणि तिने राक्षसांचा वध करून स्त्रियांना संकट मुक्त केले. देवीने आपले सौभाग्य रक्षण केले म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गौरीपूजन सण साजरा करण्याची प्रथा निर्माण झाली.

या नक्षत्रावर त्यांचे पूजन होते तसेच लक्ष्मीची मोठी बहीण ज्येष्ठ लक्षणे म्हणजे आलक्ष्मी यांचेही या दिवशी पूजन केले जाते हे खरे असले तरी तिचा अनादर करणे राग करणे, संस्कारात बसत नाही. अनिष्ट असणाऱ्या गोष्टींबद्दलही एकदम राग न करता गोड बोलून तिची पूजा करून त्यांच्या त्रासापासून दूर राहणे हा योग्य उपाय आहे.

तसेच काही ठिकाणी गणपतीची बहीण म्हणून गौराईची पूजा करतात तर काही ठिकाणी महालक्ष्मी आणि पार्वती माता या स्वरूपात त्यांची पूजा करतात. ज्या दिवशी गौराई आणायची असते. त्या आधी सर्व प्रकारे घर स्वच्छ करुन नीटनेटकी ठेवली जाते.

आपले घर सजवून जाळे दळवट, अडगळ काढली जाते कारण जेथे स्वच्छता असते तेथेच आरोग्य आणि समृद्धी असते. लक्ष्मीचा वास असतो म्हणून या सणाला घरदार अंगणात रांगोळी काढून, तोरण लावून, सारवून हळदीकुंकू टाकून, साजरे केले जाते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

स्वच्छता आरोग्याचा संस्कार देणारा सण आहे या सणाला सासुरवाशीण मुली माहेरी येतात गौराई चे गाणे म्हणतात. नदीची पूजा करतात आणि गौरीचे स्वागत करतात या दिवशी गौरीची स्थापना प्रत्येकाच्या परंपरेनुसार धान्य राशीवर फराळाच्या पदार्थांवर एखाद्यावर पाण्याने भरलेल्या घागरीवर करतात.

याचा अर्थ घरातील धनधान्याची अन्नपदार्थांची पावसात आलेल्या वनस्पतीची नदीच्या पाण्यातील वाळूच्या खड्यांची लक्ष्मीला घातलेल्या सौभाग्य अलंकारांची लक्ष्मी रूपाने पूजा केली जाते.

याचा नैवेद्य विविध भाज्या गव्हाची खीर कानवले चटणी कोशिंबीर पापड लोणचे वरण-भात पुरणाचे दिवे अशा विविधतेने त्यांची आरास करून माहेरवाशिणी यानिमित्ता ने गोडधोड खाऊ घातले जाते. खणानारळाने ओटी भरली जाते तिच्या प्रार्थना केली जाते.गौरीचा माता पार्वतीचा उत्सव आहे. यासाठी केलेली ही साधना आहे.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *