अक्षय तृतीयेला अनेक लोक सोन्याची खरेदी करतात, कारण या दिवशी खरेदी केलेलं सोनं हे अक्षय टिकत, त्याच्या किमतीत उत्तरोत्तर वाढ होते, आणि त्यातून सोने खरेदी करणाऱ्याला केवळ लाभ आणि लाभच प्राप्त होतो, अशी प्राचीन मान्यता आहे.
मात्र प्रत्येकालाच सोने खरेदी करणे शक्य होणार नाही. आणि आपल्याला सुद्धा सोने खरेदी करणे शक्य नसेल तर सोण्याऐवजी आपण सोन्या इतकीच मौल्यवान आणि तितकाच लाभ प्राप्त करून देणारी अशी एक वस्तू खरेदी करू शकता.
अक्षय तृतीया म्हणजे वर्षभरातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. याच दिवशी त्रेता युगाचा प्रारंभ झाला होता. भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची जयंती देखील याच दिवशी असते. भगवान श्री विष्णूंचा अजून एक अवतार नर नारायण यांनी सुद्धा अक्षय तृतीया लाच अवतार धारण केला होता.
मित्रांनो, या दिवशी उपवास केला जातो, स्नान- दान केलं जात आणि यातून मिळणार पुण्य हे अक्षय काळ टिकत अशी मान्यता आहे. मित्रांनो या अक्षय तृतीयेला आपण सोन्याच्या ऐवजी लक्ष्मी पाऊले म्हणजेच लक्ष्मीच्या पादुकांची खरेदी अवश्य करा. या लक्ष्मी पादुका वेग वेगळ्या धातुंमधे तुम्हाला मिळून जातील. जसे की तांबे आहे, सोने, चांदी आणि पितळ देखील आहे.
खरतर आमचा सल्ला असा आहे की आपण एखाद्या पवित्र तीर्थ ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाहून या लक्ष्मी पादुका ची खरेदी करा आणि या अक्षय तृतीयेला त्यांची स्थापना आपल्या देवघरात करा. मित्रांनो, या लक्ष्मी पादुकांची खरेदी देखील शुभ मुहूर्तावर केली गेली पाहिजे. सोने खरेदी साठी जो शुभ मुहूर्त असतो त्याच मुहूर्तावर आपण लक्ष्मी पादुकांची खरेदी करावी.
सोने खरेदीचा शुभ मुहूर्त हा संपूर्ण दिवसभर चालणार आहे, म्हणजेच 3 मे च्या पहाटे 5:39 पासून ते दुसऱ्या दिवशी बुधवारी पहाटे 5:38 पर्यंत हा मुहूर्त आहे. तूम्ही या लक्ष्मी पादुकांची स्थापना केल्यावर या अक्षय तृतीया पासून या पादुकांची विधिवत पूजा करण्यास सुरुवात करा.
मित्रांनो, ज्यावेळी लक्ष्मी पादुका आपल्या घरात येतील तेव्हा लक्ष्मीची पावले सुद्धा आपल्या घराकडे वळतील आणि लक्ष्मीच्या कृपेने घरात धन धान्य, ऐश्वर्य, संपत्ती, वैभव या गोष्टींची कधीच कमतरता भासणार नाही.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!