या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावे. उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री, मटका, आणि पंखा दान करावा.
मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था बघावी. भंडारा करून गोड-धोडाचे जेवण द्यावे याने अनंत पुण्य लाभतं.
अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी.
अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळं फुल अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे 9 दिवे लावून पूजा करावी.
श्री विष्णुसहस्त्रनाम पाठ आणि श्री सूक्त पाठ केल्याने जीवनात धन, यश, पद आणि प्रतिष्ठा प्राप्ती होते.
आजारामुळे त्रस्त असणार्यांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे. अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्याची खरेदी शुभ ठरते. नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळ दान करावे.
रुग्णालयात गोड पदार्थ, पाणी आणि फळ वितरित के ल्याने अनंत पुण्य प्राप्ती होते. या दिवशी आपल्या मित्रां ना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तक दान केल्याने देव गुरु बृहस्पती प्रसन्न होतात.
विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायला हवा आणि आता कठिण परिश्रम करेन. तसेच आई-वडील आणि गुरुंचा आशीर्वाद घ्यायला हवा.
दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फळदायी ठरतो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल. वाहन खरेदी करू शकता. किंवा घरात मंगळ कार्य करण्यासाठी मुर्हूत बघण्याची गरज नाही.
या दिवशी छत्री दान नक्की करावे. आणि जागो-जागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. आहारात सातूचे सेवन करावे. या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्त्व आहे.
मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ, घंटा व इतर पूजेचं सामान दान करावे. देवघरात पूर्ण 24 तास तुपाचा अखंड दिवा लावावा.
या दिवशी श्री रामचरितमानसमधील अरण्य काण्ड पाठ करावे. यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात. याने जन्म जन्मांतराचे पुण्य फळ प्राप्त होतं. याने रामकृपा मिळते.
वरील सर्व आध्यत्मिक महीतीत अजिबात बदल न करता आहे तशी शेअर करावी ह्या छोट्याशा स्वामीसेवेने आत्मीक समाधान आणी मानसिक आनंद मिळतो.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोण त्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!