मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनात कोणती ना कोणती समस्या असते. कोणाला आर्थिक बाबतीत, तर कोणाला उद्योग-धंद्यात यश तसेच घरातील वाद विवाद यांपासून मुक्तता हवी असते. तर मित्रांनो आज मी उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. हा उपाय तुम्हाला सकाळ दुपार संध्या काळ कोणत्याही वेळेस केला तरीही चालतो.
मित्रांनो, अंगारकी चतुर्थीला आपल्या शास्त्रांमध्ये खूपच महत्व दिले जाते. या चतुर्थीला मंगळी चतुर्थी असे देखील म्हटले जाते. मंगळवार हा गणेशांचा वार असल्या कारणाने या दिवशी आलेली चतुर्थी खूपच महत्त्वाची असते. शुभ मानली जाते. चतुर्थीच्या दिवशी अनेक भक्त जण उपवास करतात.
गणेशांचे मनोभावे प्रार्थना करीत असतात. दूर्वा, आघाडा, जास्वंदाचे फुल गणपतींना अर्पण करतात व आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी मनोमन प्रार्थना देखील करीत असतात. या उपायासाठी आपल्याला एका सुपारीची गरज आहे.
देवपूजेमध्ये असणारी किंवा एखाद्या पूजेमध्ये वापरली जाणारी सुपारी घ्यायची नाही. तुम्हाला एक नवीन सुपारी द्यायची आहे. ही सुपारी घरी आणल्यानंतर तुम्हाला ही सुपारी देवघराच्या अगदी मधोमध ठेवायची आहे. ती सुपारी ठेवण्या अगोदर दोन चार दाणे तांदळाचे ठेवून त्यावर तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे. नंतर त्या सुपारी ला हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून पुजा करायची आहे. दिवा, अगरबत्ती लावून आरती ओवाळायची आहे आणि ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला एक स्त्रोत वाचायचा आहे तो म्हणजे अथर्वशीर्ष.
अथर्वशीर्ष हे तुम्हाला स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथी मध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही एक वेळेस वाचू शकता. अशा पद्धतीने सुपारीची पूजा करून तुम्हाला अथर्वशीर्ष वाचायचे आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 एप्रिल रोजी बुधवारच्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करुन झाल्यानंतर तुम्हाला ही सुपारी पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या मंदिरांमध्ये ही सुपारी ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली देखील तुम्ही हे सुपारी ठेवू शकतात.
तर मित्रांनो तुमच्याही जीवनात काही समस्या असतील तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी जर मनोमन वाटत असेल तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सुपारीचे पूजन करून हा उपाय अवश्य करा.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!