मित्रांनो बरेच लोक पालीला पाहून खूप घाबरतात आणि जेव्हा पाल घरात येते तेव्हा आपण तिला घराबाहेर काढायला सुरुवात करतो. आपल्या घरामध्ये जर आपल्या अंगावर पाल पडली असता आपल्याला घरातील लोक लगेच हात पाय धुऊन मारुतीला तेल वाहून यायला सांगत असतात. परंतु ही पाल पडणे शुभ आहे की, अशुभ हे कोणालाच माहीत नाही.
म्हणूनच या लेखामध्ये आपण पाल अंगावर पडणे शुभ की अशुभ किंवा पाल घरामध्ये असण शुभ की अशुभ याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. धर्मग्रंथांमध्ये पाल खूप शुभ मानले जाते आणि पाल घरात असणे म्हणजे आपल्याजवळ संपत्ती असल्या सारखेच आहे. इतकेच नाही तर, पाल जर अंगावर पडली तर तेदेखील शुभ मानले जाते.
असे बरेच शुभ संकेत आपल्याला पाली पासून मिळत असतात. आपण याविषयी जाणून घेणार आहोत. आपल्या अंगावर पाल पडल्याने आपल्याला त्यापासून कोणकोणते शुभ संकेत मिळू शकतात? याची माहिती आपण जाणून घेऊयात.
साधारणपणे सर्वांच्याच घरात भिंतीवर पाल असते. घरात पाल असणे शुभ मानले जाते. कारण पालीला लक्ष्मी स्वरूप मानले जात. परंतु पाल विषारी असल्याने ती कशात तरी पडेल आणि मग घरातील व्यक्तींना विषबाधा होईल या भीतीने आपण घाबरतो. या कारणामुळे आपण तिला घराबाहेर काढतो.
परंतु पाल घरातील जीवजंतू, किडे, कीटक खाते व आपले घर कीटकांपासून मुक्त करत. म्हणून पाल घरात असणे कधीही चांगलेच असत. कधीकधी आपल्या अंगावर पाल पडते मग घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला लगेच पाणी शिंपडल्यास सांगतात. हे असे का सांगतात? हे आपल्याला माहीतच नसते. परंतु त्यांनी सांगितले की, आपण लगेच त्यांचे ऐकून पाणी शिंपडतो. पाल जर आपल्या अंगावर पडली ती आपल्या शरीराच्या कोणत्या भागावर पडली आह?
यावर त्याचे शुभ-अशुभ फळ मिळत. असे मानले जात. शरीराच्या कोणत्या भागावर पडल्यास शुभ फळ मिळते व कोणत्या भागावर पडल्यास अशुभ फळ देते? ते आज आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या मानेवर जर पाल पडली तर, आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते. हातावर पाल पडली तर असे समजावे की, धनलाभ होणार आहे आणि जर पाल आपल्या पायावर पडली तर कुठेतरी किंवा ठिकाणी यात्रा घडणार आहे असे समजावे. याचा अर्थ असा आहे की, आपण कोणत्यातरी ठिकाणी बाहेर फिरायला जाणार आहोत. संबंध करताना पाल दिसल्यास असे समजावे की, आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींशी आपली भेट होणार आहे.
जर आपल्या कपाळावर पाल पडली तर, आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर केसांवर पाल पडली तर असे समजावे मोठे संकट आपल्यावर येणार आहे आणि डाव्या कानावर पाल पडल्यास असे समजावे की, आपल्याला काहीतरी दागिना मिळणार आहे. आणि जरी कानावर पडले तर असे समजावे की, आपल्या आयुष्य मध्ये वाढ होणार आहे. म्हणजे जर काही दुर्घटना झाली असेल किंवा काही मोठा आजार झाला असेल तर यातून आपण सुखरूप बाहेर पडणार आहोत.
मिशीवर पडणे देखील चांगले मानले जाते.याचा अर्थ असा आहे की, त्या व्यक्तीचा सन्मान होईल आणि लोक त्याची चांगली प्रशंसा करतील. उजव्या गुडघ्यावर पाल पडणे हे देखील चांगले मानले जाते. याचा अर्थ असा आहे की, आपल्याला कोणत्या तरी ठिकाणाहून पैसे मिळणार आहेत. जर तळापासून भिंतीच्या वरच्या भागा वर चढत असेल तर ते देखील शुभ लक्षण आहे.
जर दोन पालींचे भांडण होत असेल म्हणजेच भांडताना दिसल्यास असे समजावे आपण वेगळे होणार आहोत व काहीतरी दुःखद बातमी ऐकायला येऊ शकते. जर आपल्याला खबर पडले तर त्याचा अर्थ असा आहे की आपले नशीब बदलणार आहे. आपण यशस्वी होणार आहोत. चुकून पाल गळ्यावर पडली तर, समजून घ्या की तुमचा शत्रू नष्ट होणार आहे आणि तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवाल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!