जी व्यक्ती जीवनात, स्वामींच्या या अनमोल मंत्राचे पालन करते, त्याची प्रगती होणार म्हणजे होणारच. श्री स्वामी समर्थ.

मानवी जीवन यशस्वी व्हायचा तडजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे.जिथं जिथं तडा जाईल तिथं तिथं जोड देता आला की कुठलंच नुकसान होत नाही.

तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात होय. कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नका. आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असल्यास ते काम सोडूच नका. जर आपला हेतुच शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांची टीकेला काहीच महत्व नसते. चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात.

दुस-यांची मदत करण्यासाठी कोणाकडे ही वेळ नसतो परंतु दुस-यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वाकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलत.

परीवर्तन हा निर्सगाचा नियम आहे, तो न घाबरता मान्य करावा. संघर्ष करायला घाबरणे ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत.
जीवनात सर्वात मोठा गुरू येणारा काळ असतो, कारण हा काळ जे शिकवतो ते कोणी शिकवू शकत नाही.

विश्वास कायम असावा कारण अनुभव आपल्याला बळकट बनवतो.दुःख आपल्याला माणूस बनवते, अपयश विनम्रता शिकवते, यश व्यक्तीमत्वाला चमक देते. परंतु फक्त विश्वासच आपल्याला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.

प्रार्थनेमुळे देव बदलत नाही, तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते. अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले असते.

काही शब्द असतातचं असे की ते नेहमीचं ऐकावे असचं वाटतं. काही नाती असतातचं एवढी गोड की ती कधी संपूचं नये असचं वाटतं. आणि काही माणसं असतातचं एवढी आपली की ती नेहमी आपलीचं असावीत असचं वाटतं.

काळजी हृदयात असते शब्दांत नाही आणि राग शब्दात असतो हृदयात नाही. गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही पाहिजे. एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे.

आंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का? आंधळा म्हणाला काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना. दृष्टी नाही तर बघण्याचा दृष्टीकोन चांगला पाहिजे. मनात श्रद्धा आणि सबुरी व आत्मविश्वास पाहिजे, मग सगळ मनासारख होत राहते

आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा, आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.

आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी लोकांच्या भूलथापा व अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा त्यांच्या भविष्याचा विचार करा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *