अनेक घरांमध्ये लहान मुलांना रामरक्षा शिकवली जाते. रामरक्षा दीड हजार वेळा उच्चारली असता रामरक्षास्तोत्र सिद्ध होते आणि त्या मुलाच्या आवतीभोवती एक सुरक्षाकवच निर्माण होते. साधारणत: 5 वर्षांमध्ये रामरक्षेचे दीड हजार आवर्तन सहज होऊ शकतात.
म्हणजे पहिलीपासूनच जर मुलाला नित्य रामरक्षा म्हणायला सांगितली तर साधारणता 5 वी, सहावीपर्यंत त्यांची १५०० आवर्तन पूर्ण होतात. मुलाच्या नकळत एक सुरक्षाकवच त्याच्या व्यक्तिमत्वाभोवती निर्माण होते. मुलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पालक काळजीत असतो आणि वर्तमान परिस्थितीमध्ये अनेक संकटांना मुला-मुलींना सामोरे जावे लागते. मुलेमुली घरी येईपर्यंत आईला काळजी असते.
अशा असुरक्षित वातावरणात रामरक्षास्तोत्र मुलांना सुरक्षाकवच प्रदान करते. रामरक्षासोबत भीमरूपी हनुमानस्तोत्र म्हटले असता मुलांची शरीर, मानसिक आणि बौद्धिक क्षमता शक्तिशाली, प्रतिभाशाली , तेजस्वी होते.
आपण आधी ” गायत्रीमंत्र ” विषयी पाहिले. आज रामरक्षेचे महत्व पाहिले. कोणतेही मंत्रश्लोकप्रार्थना सुरक्षा प्रदान करतेच. परंतु त्यामध्ये विशेष “रामरक्षास्तोत्र” विषयी शास्त्रात सांगितले आहे. रामरक्षेचा सखोल अर्थ सांगितला आहे.
” Physics and Chemistry of Human Body ” हे परदेशी शास्त्रज्ञांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की ” रोज ५ मिनिटे जरी मनापासून मंत्र श्र्लोक अशी साधना केली तर ३ महिन्यात रक्ताच्या सर्वच जुन्या पेशी नाहीशा होतात आणि निर्माण होणाऱ्या नवीन रक्ताच्या पेशी ह्या पहिल्या रक्ताच्या पेशीपेक्षा अधिक तेजस्वी, बलवान, शक्तिशाली, निरोगी तयार होतात.
अशीच साधना ७ वर्षे केली असता हाडांपर्यंतच्या सर्वच पेशी बलवान, निरोगी तयार होतात. त्याचे शरीर पूर्णतः आजारमुक्त आणि निरोगी होऊ शकते.” हे परदेशी संशोधकांनी सिद्ध केले. आपल्या देशातील महान ऋषीमुनी आणि सतपुरुषांनी ध्वनीच्या ( Sound Energy ) ठिकाणी असलेल्या सामर्थ्याला वैदिक काळापासून जाणले आहे. आजपर्यंत यासाठीच सर्वच संतांनी
” नामसाधना ” ची महिमा जनमानसात रुजविण्याचा नित्य प्रयत्न केला आहे.
ज्यावेळी आपण ठराविक वेळेला, ठराविक कालावधी आणि ठराविक जागी ठरवून साधना करतो त्यावेळी ती साधना सिद्ध होते. यासाठी आपल्याला आवडेल असा अथवा सद्गुरूंनी दिलेले मंत्र , स्तोत्र, नामसाधना आपण करू शकतो. असे केल्याने आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी, मन आणि बुद्धी शक्तिशाली होते. तसेच ते स्थानही शुद्ध होते.
रशियामध्ये भारतीय मंत्र स्तोत्रांविषयी अनेक संशोधन झाले. त्यांनी भारतीयांकडून अनेक मंत्रश्र्लोकांचे रेकॉर्डिंग करवून घेतले. त्यामध्ये सिद्ध झाले आहे की ओंकार आणि गायत्री मंत्र वातावरण शुद्ध करते. वातावरणात ऋणतत्व ( negative ions) अधिक असतील तर वातावरण शुद्ध राहते आणि जर धनतत्व ( positive ions ) वाढले तर वातावरण दूषित होते.
वातावरणात प्रदुषण वाढते. सर्वच मंत्रांच्या तुलनेत गायत्री मंत्र आणि ओंकाराच्या उच्चारामुळे वातावरणामध्ये ऋणतत्व अधिक प्रमाणात वाढतात असे त्यांच्या संशोधनात सिध्द झाले आहे.
अन्य धर्मात दिवसभरात ठराविक वेळी त्यांची प्रार्थना मोठ्याने म्हटली जाते. सृष्टीमध्ये अशी एक वेळ येईल की भारतीयांचे मंत्रश्लोक जगाला २४ तास ऐकावे लागतील. “आता ती वेळ आली आहे हे आपण सर्वजणच अनुभवतो आहोत.आजची परिस्थिती पाहता प्रत्येक वयातील व्यक्तीलाच आपल्याभोवती सुरक्षाकवच निर्माण करणे अत्यावश्यक आहे. ” संध्यावंदन ” जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे ही काळाची गरज आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!