विवाहित महिलांनी चुकूनही गळ्यात असे मंगळसूत्र घालू नये, पतीचे आयुष्य होते कमी.

आपल्या हिंदू धर्मात, मंगळसूत्राला विवाहित स्त्रीसाठी अनन्यसाधारण  महत्त्व आहे. मंगळसूत्र सूत्र पती – पत्नीमधील दृढ संबंध दर्शवते. मित्रांनो, ही परंपरा आजपासून नाही तर अनादी काळापासून चालू आहे. आपल्या हिंदू धर्मात मंगळसूत्राशिवाय लग्न होत नाही.

असेच मंगळसूत्राशी संबंधित खूप महत्त्वाच्या बाबी आहेत, ज्याबद्दल प्रत्येक विवाहित स्त्रीला माहित असले पाहिजे. मंगळसूत्राशी संबंधित गोष्टिंकडे दुर्लक्ष केवळ तिच्या पतिलाच नाही तर स्त्रीच्या कुटुंबालाही त्रास देऊ शकते.

हिंदू धर्मामध्ये मंगळसूत्र घालण्याची पद्धत आहे. ते सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे मंगळसूत्र घातले जाते असे म्हणतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील कलह दूर करण्याची ताकद मंगळसूत्रामध्ये असते असे म्हटले जाते. मंगळसूत्र घालण्याचे काही अन्य महत्व देखील सांगितले जातात.

पण ती आताच्या काळातील महिलांना अजिबात पटणार नाही. कारण या गोष्टी अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या अशाच वाटतात. पण असे म्हणतात की, मंगळसूत्रातील काळे मणी हे नकारात्मक उर्जेपासून तुमचे संरक्षण करते. आपल्या हिंदू परंपरेत स्त्रिया लग्नानंतर अनेक दागिने घालतात आणि सोळा शृंगार करतात, पण मंगळसूत्र हे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे मानले जाते की ते विवाहाच्या विधीचा मुख्य भाग आहे.

हिंदू विवाहित स्त्रियांसाठी मंगळसूत्र, ज्यात काही पिवळे काळे मोती आणि कधीकधी पेंडंट देखील एक धाग्यात ओवलेले असते, हा धागा इतर कोणत्याही वस्तूंपेक्षा जास्त किमतीचा मानला जातो. मंगळसूत्राची तुलना इतर दागिन्यांशी करता येत नाही. मंगळसूत्राचा मोठा महिमा प्राचीन काळापासून सांगितला गेला आहे. मंगळसूत्र हे विवाहाचे प्रतिक आणि सौभाग्याची निशाणी मानले जाते. म्हणून, लग्नानंतर, विवाहित स्त्रिया ते श्रद्धेने गळ्यात घालतात.

लग्नाच्या वेळी, वधू तिच्या गळ्यात मंगळसूत्र धारण करते आणि या विधीशिवाय लग्न अपूर्ण मानले जाते. विवाहित हिंदू स्त्रिया हे सर्वात महत्वाचे दागिने मानतात आणि त्यांच्या सौभाग्याची निशाणी मानुन आजीवन गळ्यात परिधान करतात. मंगळासुत्राला विवाहित महिलांचे रक्षा कवच मानले जाते.

मंगळसूत्राला संस्कृतमध्ये ‘मांगल्यतंतू’ असेही म्हणतात. यात दोन पदरी दो-यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी ४ छोटे मणी व २ लहान वाट्या असतात. एक पती, दुसरी पत्नीकडील. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन. ४ काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ.

विवाहित महिलांनी चुकूनही गळ्यात असे मंगळसूत्र घालू नये, यामुळे पतीचे आयुष्य कमी होते- शास्त्रामध्ये सांगितले आहे की, लग्नाच्या वेळी, जेव्हा एखाद्या महिलेचा पती तिला मंगळसूत्र धारण करतो, त्यानंतर तिने तिचे मंगळसूत्र काढू नये, जेव्हा काही अघटित घटना घडते तेव्हाच ते तुमच्या गळ्यातून काढले पाहिजे.

जर मंगळसूत्र काही महत्वाच्या कारणास्तव उतरवायचे असेल, तर तुम्ही तुमच्या गळ्यात एक छोटा काळा धागा घाला, जे स्त्री तिच्या पतीच्या नावाचे मंगळसूत्र आयुष्यभर घालते. मंगळसूत्रात जे काळे मोती आहेत, तुम्ही कधी विचार केला आहे की असे का होते? की प्रत्येक मंगळसूत्र काळे मणी आणि सोन्याने बनवलेले असते, काळा रंग वाईट शक्तींना आणि वाईट उर्जेला दूर ठेवण्यासाठी असतो, हेच कारण आहे की मंगळसूत्र हे त्या काळ्या मण्यांपासून बनवलेले असते, जे नेहमी वाईट नजरेपासून तुमचे रक्षण करते.

प्रत्येक स्त्रीला लग्नात तिच्या पतीकडून मंगळसूत्र परिधान केले जाते, जे स्त्री पतीच्या मृत्यूनंतरच काढते आणि पतीला अर्पण करते. कोणत्याही परिस्थितीत त्यापूर्वी मंगळसूत्र काढण्यास मनाई आहे. मंगळसूत्र हरवणे किंवा तूटने अशुभ मानले गेले आहे.
शास्त्रानुसार, स्त्रियांनी इतर कोणत्याही महिलेचे मंगळसूत्र कधीही परिधान करू नये किंवा त्यांनी कधीही त्यांचे मंगळसूत्र इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नये. असे केल्याने पतिचे आयुष्य कमी होते, तसेच पति-पत्नी मधील प्रेम कमी होते.

ज्याप्रमाणे विवाहित स्त्रीच्या जीवनात सिंदूर आणि जोडव्याचे  महत्त्व असते, त्यापेक्षाही जास्त मंगळसूत्राला महत्त्व आहे. स्त्रिया आपल्या पतिच्या दीर्घायुष्यासाठी मंगळसूत्र घालतात, त्यासोबतच हे वैवाहिक जीवनाला वाईट नजरेपासून वाचविते.
ज्योतिषशास्त्रात म्हटल्याप्रमाणे सोने प्रत्येक मंगळसूत्रात असले पाहिजे, जरी ते थोडे असले तरी, परंतु काही स्वरूपात असले पाहिजे.

सोने गुरु ग्रहाच्या प्रभावाला कमी करते. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद, समृद्धी आणि प्रेम वाढते. सोने परिधान केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते. यामुळे आपले आयुष्य आनंदी होते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *