अशुभ घटना टाळण्यासाठी नवीन गाडीची पूजा करताना करा हा विधी, कधीही अपघात होणार नाही.

मित्रांनो, आपल्याला आपला हिंदू धर्म शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की, कोणतेही कार्य करण्याआधी त्याचे पुजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव पडत नसतो.

याच कारणासाठी आपण कोणतेही वाहन घेतले तर, त्याचे प्रथम पूजन आपण करत असतो. हे पूजन कशा प्रकारे करावे व त्या पूजेची सामग्री कोण कोणते असावे व त्याची विधी कशी असावी? याचे संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. की जेणेकरून अशुभ घटना आपल्या सोबत घडणार नाही.

आपण प्रत्येक जण नवीन वाहने खरेदी करतो व त्याची पहिल्यांदा पूजा करून मग त्याचा वापर करण्यास सुरुवात करतो. पूजा आपण अशुभ घटना टाळण्यासाठी करत असतो. आपण पाहत असतो की, आपण कोणतीही वस्तू नवीन खरेदी केल्यावर किंवा कोणतीही वस्तू घरी आणल्यावर त्याची प्रथम पूजा करत असतो.

कारण असे म्हटले जाते की, त्याच्या वरचा अशुभ प्रभाव कमी व्हावा व शुभ प्रभाव वाढावा. यासाठी आपण त्याची पूजा करत असतो. आपल्या प्रत्येकाच्या घरी एखादी तरी गाडी ही असतेच. ही गाडी खरेदी केल्यानंतर त्याचा एखाद्या व्यक्तीवर शुभ असे परिणाम होतात. एखाद्याला ते अशुभदायक देखील असते.

हा शुभ अशुभ परिणाम एखाद्या वस्तूवरून आपल्या जीवनात पडत असतो. म्हणूनच त्याची विधीवत व्यवस्थित पूजा करणे खूप गरजेचे असते. ही पूजा कशी करावी? याची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

वाहन खरेदी केल्यानंतर त्याची पूजा करण्यासाठी आपल्याला कोण कोणते साहित्य आवश्यक आहे हे आपण जाणून घेऊयात. प्रथम म्हणजे श्रीफळ,फुले, हार, कापूर, पाण्याचा कलश व मिठाई किंवा गुळ, कलावा, कुंकू हळद, तुपाचा दिवा, दूर्वा आणि आंब्यांची पाने इत्यादी सामग्रीची आवश्यकता असते. त्याचबरोबर वाहन खरेदी करताना तो दिवस शुभ असणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे असते.

वाहन खरेदी केल्यानंतर त्याची पूजा करण्यासाठी प्रथम आपल्याला कलशामध्ये पाणी घेऊन दुर्वा किंवा आंब्याचे पाने घेऊन ते पाणी आपल्या वाहनावर शिंपडावे. असे केल्यामुळे त्या वाहनांची शुद्धीकरण होते व वाईट दृष्टी चा प्रभाव देखील कमी होतो. हे पाणी तीन वेळेस शिंपडावे. नंतर कुंकू मध्ये तूप मिक्स करून स्वस्तिक वाहना वरती काढावे. नंतर फूल अर्पण करून गाडीला हार घालावा.

त्यानंतर आपण कलावा घेतलेला आहे तो गाडीला बांधावा. नंतर गाडी ची आरती करावी व कलशातील पाणी हे गाडीचा सर्व बहुत यांनी टाकावे व नैवेद्य दाखवावा आणि हा दाखवलेला नैवेद्य गायीला खाऊ घालावा. नंतर एक नारळ घेऊन गाडीवरून सात वेळेस उतरून घ्यावा व ते गाडीचा समोर ठेवून ते गाडीनेच फोडावे. शक्य असल्यास गाडी प्रथम कोणत्याही एका मंदिराजवळ घेऊन जावेत.

अशाप्रकारे आपल्या वाहनांची पुजा करावी. जेणेकरून त्याच्यावर अशुभ परिणाम पडणार नाहीत.वाहनाचा अशुभ प्रभाव देखील आपल्या जीवनावर होणार नाहीत.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *