ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 8 असतो. 8 हा अंक सत्ता, धन आणि संपत्ती यांच्याशी संबंधीत आहे. मूलांक ८ हा एकाकी आणि स्वतत मशगूल राहणारा म्हणजे दुसऱ्यांवर प्रकट न होणारा अंक आहे. त्याला भौतिकवादी समाजाकडून स्वतची उपेक्षा झाल्याची तक्रार असते.
मूलांक ८ असलेल्या व्यक्तींचे तांत्रिक ज्ञान हे सर्वसाधारण लोकांपेक्षा अधिक असते. त्यांना प्रत्येक विषयाची थोडीफार माहिती असते. या व्यक्ती स्वतच्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करु शकत नाहीत. त्यामुळे अडचणीच्या वेळी त्यांना सहानुभूती मिळत नाही. या अंकात प्रचंड शक्ती आहे आणि जर तुमचा जन्मांक 8 असेल आणि कोणी तुम्हाला सांगत असेल की 8 हा अंक वाईट आहे, तर अजिबात घाबरू नका.
कारण नेहमी लक्षात ठेवा की कोणताही अंक चांगला किंवा वाईट नसतो, आणि प्रत्येक अंकात कांही गुण तर कांही दोष असतात. तुम्ही तुमच्या क्षमता ओळखा, त्यानुसार स्वतःचा विकास करा. एक दिवस असा येईल की 8 अंकाला वाईट ठरवणारे लोक मागे पडतील आणि तुम्ही नक्की पुढे जाल.
त्याचबरोबर सतत तणावाखाली रहाणे, छोटाश्या कारणाने नाराज होणे, झटपट निर्णय न घेणे, कामे पुढे ढकलणे, एकल कोंडेपणा, अतिरिक्त ठामपणा, इतरांशी फारसा संवाद न साधणे, आपल्या भावना व्यक्त न करता येणे हे 8 हा जन्मांक असणाऱ्यां चे कांही ठळक दोष आहेत आणि यांचे लहानपण बहुधा खडतर गेलेले असते आणि यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट उशीरा घडत असते आणि त्यांना घरून फारसे कांही मिळत नाही आणि ते जे कांही करतात ते स्वत:च्या हिम्मतीवर करतात. आयुष्याच्या उत्तरार्धात या व्यक्ति खूप यशस्वी झाल्याचे दिसते.
ज्यांचा जन्मांक 8 आहे अशा व्यक्तींकडे व्यवस्थापन, अधिकारी, फंड मॅनेजमेंट या गोष्टींची उपजत क्षमता असते. त्याचबरोबर या व्यक्तींकडे धन कमावण्याची आणि संपत्ती निर्माण करण्याची मोठी क्षमता असते. याशिवाय त्यांच्याकडे आपल्या क्षेत्रात सत्ता मिळवण्याची ही क्षमता असते. त्यांच्याकडे या क्षमता उघड किंवा सुप्त अवस्थेत असतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो या व्यक्ती सहसा रॉयल राहणीमान असणाऱ्या असतात आणि यांच्यामध्ये करुणाभाव असतो, आणि एखाद्या मानवतावादी कामात आपले आयुष्य झोकून द्यायची क्षमताही असते.
हा अंक परस्परविरोधी गुणदोष असणारा आहे. म्हणजे हा जन्मांक असणाऱ्या व्यक्तीमध्ये अतिशय यशस्वी होण्याची अथवा अतिशय अयशस्वी होण्याची क्षमता असते. त्याचप्रमाणे ते प्रत्यक्ष जीवनात ते एकतर हिरो नाहीतर व्हिलन होतात आणि म्हणूनच ज्योतिष शास्त्रानुसार 8, 17, 26 या तारखेस जन्मलेल्या लोकांचे गुणदोष साधारणपणे वरीलप्रमाणे असतात, आणि 8 पेक्षा 17 मध्ये आणि 17 पेक्षा 26 मध्ये हे गुणदोष जास्त प्रमाणात आलेले दिसतात.
ज्या व्यक्तिंच्याबद्दल यांना आपुलकी असते, त्यांना या व्यक्ति बोलून दाखवत नाहीत, तर त्यांच्यासाठी कांहीतरी करून दाखवतात आणि या व्यक्ति सावधचित्त असतात, समोरच्या व्यक्तीला जज करण्यात पटाईत असतात आणि समोरील व्यक्ति वाईट भावनेची असेल तर यांना ते लगेच कळते. हे गुण जन्मांक 8 असणा-या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. हा जन्मांक असणा-या लोकांना येणाऱ्या समस्या या बहुतेक वेळा त्यांनी स्वत: ओढावून घेतलेल्या असतात.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर ही नक्की करा धन्यवाद..!!