तुम्हीही दुधात पाणी घालतात का? बघा यावर बाळू मामा काय म्हणताय; कसा होतो या लोकांचा शेवट..?

बेळगाव जवळील चिक्कोडी येथे सर्वसामान्य धनगर कुटुंबात 3 ऑक्टोबर 1892 साली जन्मलेले बाळूमामा अध्यात्मिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करून संतश्रेष्ठ बनले. अ’निष्ट चालीरीती, अं’धश्रद्धा यापासून समाजाला दूर ठेवण्याचे कार्य करताना बाळूमामा यांनी अनेक च’मत्कार केले. आयुष्यभर घराचा संसार सोडून बाळूमामा यांनी गोरगरिबांचे दुःख दूर करण्याचे काम केले होते. लहनापासून थोरापर्यंत, गरीबापासून

श्रींमतापर्यंत व अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरांतील स्त्री-पुरूष त्यांचे भक्त होते व आहेत. शर्ट, धोतर फेटा, कांबळा, कोल्हापूरी चप्पल हा त्यांचा पेहराव.भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे. ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी असो. बक-यांसवे शिवारातचं त्यांचा मुक्काम असे.गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी १९३२ सालापासून भंडारा उत्सव चालू केला. आजच्या लेखात आपण एक प्रसंग बघणार आहोत, ज्यात कृपावंत बाळू मामांनी एका कुष्ठरोग्यास पूर्णपणे बरे केले आहे.

मित्रांनो एकदा बाळूमामा रूकडी’ला लक्ष्मीबाईच्या घरी आले होते. त्यावेळी संत-महात्मे घरी आले यासाठी शेतकऱ्याने कुटुंबाने पुरणपोळी करण्याचा बेत आखला. सायंकाळची वेळ होती पुरण पोळी ला घ्यावे लागते. बाळूमामा बापूंना म्हणाले आज बिन पाणी घातलेलं दुध आन. भाऊ नगरे हे गवळी कडे गेले. आणि गवळ्या’ला बजावून सांगितले. आणि अख्खी दुधाची घागर घेऊन आले. घरी आल्यावर बाळूमामा नि म्हणलं या दुधात पाणी आहे काय?

त्यावर गवळी स्वतः म्हणाला दुधात एक थेंब पाणी नाही. जसं मिळलय तसं आणलय. त्याक्षणी बाळुमामा नी घागरीत भंडारा टाकला. त्याक्षणी चमत्कार झाला. गवळ्याने घातलेले पाणी घागरीच्या तळाला जमले. अस्सल दूध वर राहिले. घागरातील दूध ओतून पाहता प्रथम दूध वेगळे आले. तळाचे पाणी मात्र शेवटी तळाला बाकी राहिले. त्याक्षणी

बाळूमामा गवळ्याला म्हणाले. माणसाने माणसालाही देताना दुधात पाणी घालू नये. आणि तू तर देवांना आणि भक्तांना ही दुधात पाणी मिसळून करून देतोस. आता तर प्रत्यक्ष दिलेस तुला तर या पापाचे प्रायश्चित भोगावे लागणारच. त्याअगोदर एक महिना संपण्यापूर्वीच तो गवळी मरण पावला.

वरील घटनेनंतर रूकडी, माणगाव, वडगाव, तोप संभापूर, खोची आणि आसपासची गावे बाळूमामा अतिशय निष्ठेने मानू लागली. त्यांची सेवा करू लागली. बापू शिंगारे यांच्या बहिणीला कुष्ठरोग झाला होता. बाळूमामाना शिंगारे यांनी

हात जोडून कळकळीची विनंती केली. बाळू कवडे माझे मेहुने आहेत. माझ्या बहिणीचा संसार वीसकटण्याची वेळ आली आहे. आपण कृपा करावे आम्हाला तुमच्या शिवाय कोणाचा आधार नाही. दया करा, कृपा करा, क्षमा करा. मामांनी कृपावंत होऊन त्यास भंडारा खायला दिला. आणि बाळू कवडे यांचा कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला. सर्वांना आनंद झाला. मामांचे नाव सर्वत्र पसरलं.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *