मित्रांनो.. आपल्यातील बरेचजण महादेवांचे भक्त असतात आणि म्हणूनच ते दररोज नित्य नियमाने महादेवांची पूजा-अर्चा करत असतात त्याचप्रमाणे आपल्या घराशेजारी महादेवाच्या मंदिरा मध्ये जाऊन त्यांना अभिषेक घालून बेलपत्र अर्पण करून त्यांची अगदी मनापासून पूजा-अर्चा करत असतात आणि त्याचबरोबर काही जण रोज सकाळी स्वच्छ स्नान केल्यानंतर महादेवांच्या प्रतिमेसमोर बसून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा एक माळ जप देखील करतात.
आपल्याला माहीतच आहे की भक्ताच्या थोड्याच भक्तीने महादेव त्यांच्यावर लगेच प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपल्यातील बरेच जण महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची उपासना पूजा आजच्या आणि त्याचबरोबर अनेक वेगवेगळे उपाय देखील करत असतात.
पण हे उपाय करत असतानाच अनेक जण आपल्या घरामध्ये शिवलिं’गाची स्थापना करत असतात आणि त्याची दररोज नित्य नियमाने पुजा अर्चा व अभिषेक देखील करत असतात पण मित्रांनो जर आपल्या घरामध्ये शिवलिंग आपण स्थापित केले असेल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
आज आपण अशा काही गोष्टी किंवा नियम पाहणार आहोत की जर तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिं’गाची स्थापना केली असेल तर यांचे तुम्हाला काटेकोरपणे पालन करायलाच पाहिजे. मित्रांनो आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिं’गाची स्थापना केली असेल तर ते शिवलिंग शक्यतो एकच असावे एकापेक्षा जास्त शिवलिं’गाची स्थापना आपल्या घरामध्ये करू नये. आणि त्या प्रतिष्ठापणा केलेल्या शिवलिं’गाची दररोज न चुकता पूजा,अर्चा करावी आणि शक्य असल्यास तिला अभिषेक ही घालावा.
मित्रांनो दुसरा नियम असा आहे की जर तुमच्या घरा मध्ये शिवलिं’ग असेल तर त्याच्यावर कायमस्वरूपी जलधारा होणे गरजेचे आहे. आत्ताचे वेळी पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये असे स्टॅन्ड मिळतात तिच्यामुळे आपण आपल्या घरातील शिवलिं’गावर कायमस्वरूपी जलधारेचा प्रवाह करू शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज शिवलिं’गावर तुम्हाला बेलपत्र अर्पित करायचे आहे आणि जर दररोज बेलपत्र शिवलिं’गावर अर्पण करणे शक्य नसेल तर कोणत्याही प्रकारची फुले तुम्ही शिवलिं’गावर अर्पित करू शकता.
शिवलिं’गाचे मुख हे नेहमी उत्तर दिशेला असावे, त्याचप्रमाणे जर तुम्ही मांसाहार केला असेल तू मध्यापासून केली असेल अशा वेळी चुकूनही या शिवलिं’गाला स्पर्श करू नये आणि स्त्रियांनी मा’सिक पा’ळी’च्या वेळी त्या शिवलिं’गाची पूजा व अभिषेक करू नये.
मित्रांनो शिवलिं’गावर कधीही चुकून तुळशीचे पान ठेवू नये, पण शक्यतो शिवलिंगाचा वरचा भाग कधीही मोकळा घेऊ नये त्याच्यावर एखादे फूल किंवा बेलपत्र कायमस्वरूपी ठेवावेच आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरा मध्ये जर शिवलिं’ग असेल तर त्यावर कधीही कुंकू किंवा हळद अर्पण करू नये, शिवलिं’गावर कायमस्वरूपी भस्म किंवा चंदनच लावावे. त्याचबरोबर शिवलिं’गावर कायमस्वरूपी तांब्याचा किंवा चांदीचा सर्प ठेवावा, नित्यनियमाने शिवलिं’गाला स्नान घालून त्यांची पूजा करावी याची नोंद सर्व पुराणामध्ये केली गेली आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!