चेहरा च’मकदार बनवण्यासाठी तो आतून नि’रोगी बनवणे आवश्यक आहे. अन्यथा कोणतेही क्रीम-पावडर त्यावर प्रभाव दाखवू शकणार नाही. जेव्हा आपण त्वचा आतून निरोगी बनवण्याबद्दल बोलतो तेव्हा आपला अर्थ आहाराशी संबंधित असतो. जर तुम्ही तुमच्या आहाराविषयक सवयी सुधारल्या तर त्वचा आतून नि’रोगी व्हायला लागते. ज्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसून येईल.
या चांगल्या सवयी तुमच्या चेहऱ्याचे अकाली वृ’द्धत्व टाळतात, जे क्रीम-पावडर करू शकत नाही. जाणून घ्या त्वचेसाठी चांगल्या सवयी. या चांगल्या सवयी सै’ल त्व’चा आणि सुरकुत्या यापासून देखील संरक्षण करतात. ज्यामुळे तुम्ही अकाली वृद्ध दिसत नाही. चला तर मग जाणून घेऊया त्वचेसाठी फायदेशीर आहाराविषयक चांगल्या सवयींबद्दल. त्वचेला आतून चमकदार बनवणाऱ्या चांगल्या सवयी..
आनंदी रहा – रोजच्या आहारात असणाऱ्या विविध अन्नपदार्थाचा आपल्या विचारांवर किंवा भा’वनिक जडणघडणीवर परिणाम होतो. श’रीराला सातत्याने होणारा पोषक घटकांचा पुरवठा आणि योग्य प्रमाणात असलेली आहारपद्धती यामुळे शरीराचे चांगले पोषण होऊन शरीरांतर्गत होणाऱ्या जीवरासायनिक प्रक्रियेच्या साखळीत सुधार होऊन त्याचे चांगले परिणाम शा’रीरिक -मा’नसिक पातळीवर दिसून येतात.
अकाली वृ’द्धत्वापासून दुर राहण्यासाठी आहाराबरोबरच आनंदी असणे देखील महत्त्वाचे आहे. कारण, आनंदी राहिल्याने चेहऱ्यावर च’मक राहते आणि जे दुःखी आणि निराश राहतात, त्याचा चेहरा नेहमी नि’र्जीव आणि नि’स्तेज दिसतो.
रात्री हलके अन्न खावे – रात्री जड अन्न खाऊ नका, कारण झोपताना पचन मंदावते आणि अन्नाचे पचन नीट होत नाही. त्यामुळे शरीरावर च’रबी जमा होऊ लागते. पोटाव्यतिरिक्त ही च’रबी चेहऱ्यावरही जमा होऊ लागते. त्यामुळे चेहरा सुजल्यासारखा दिसतो. या स्थितीला पफी फेस असेही म्हणतात.
रात्रीचे जेवण हलके-फुलके घ्यावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. यामागे अनेक कारणे आहेत. यासाठी रात्रीच्या जेवणात अधिक तेल-मसाल्यांचा वापर करू नये. पचनास जड असलेले अन्न खाऊन झो’पल्याने पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. पोट जड वाटणे किंवा म’लावरोध असे त्रा’स या आहारामुळे होतात. शिवाय, असा आहार घेतल्याने झोपही व्यवस्थित पूर्ण होत नाही.
जेवनानंतर वॉक करावा – जेवल्यानंतर वॉक करणे खूप महत्वाचे आहे. कारण अन्नाचे पचन झाल्यावर त्यासोबत विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर पडतात. या टॉक्सिन्समुळे चेहऱ्यावर मुरुम, सुरकुत्या इत्यादी होऊ शकतात. जेवणानंतर चालण्यामुळे आपल्याला घाम येतो. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर घामाद्वारे शरीराबाहेर पडतात.
तिखट-मसालेदार पदार्थ कमी खा – उत्तम आरोग्याची व्याख्या म्हणजे श’रीराच्या पचनसंस्थेचे सुरळीत चालणारे कार्य. शरीरात अन्नाचे व्यवस्थापन चांगले होत असेल तर इंद्रिये आणि मन प्रसन्न राहतात. पचनसंस्था सुरळीत कार्यरत ठेवण्यासाठी आहारात सर्व रसांचे से’वन केले पाहिजे. विविध अन्नपदार्थांत आंबट, खारट, तिखट, तुरट, गोड आणि कडू हे प्रमुख सहा अन्नरस आढळून येतात.
जे लोक तिखट-मसालेदार पदार्थ जास्त खातात, त्यांच्या चेहऱ्यावर मु’रुम येऊ लागतात. मुरुमांनंतर, चट्टे राहतात, ज्यामुळे त्वचा कुरूप होते. त्यामुळे तिखट-मसालेदार आणि तळलेले पदार्थ कमी खावेत. यामुळे त्वचेमध्ये टॉक्सिन्स आणि उष्णता निर्माण होत नाही.
फळे आणि सॅलड यांचा समावेश – सुंदर आणि त’रुण दिसायला कोणाला आवडत नाही? आपली त्वचा डागरहित, पिंपल्स नसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, यासाठी तुम्हाला त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा दीर्घकाळ निरोगी आणि तरुण ठेवण्यासाठी काही आहारात फळे आणि सॅलड
समावेश करणे आवश्यक आहे. चेहरा निरोगी ठेवण्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असले पाहिजे. त्यासाठी फळे आणि हिरव्या भाज्यांचे सॅलड जरूर खावे. कारण शरीराला पाण्याचा पुरवठा करण्यासोबतच या गोष्टींमधून जीवनसत्त्वे आणि खनिजेही मिळतात.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.