भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे, मांसाहार करणाऱ्या व्यक्तीची पूजा व्यर्थ जाते? जाणून घ्या सत्य.

मित्रांनो, कधी कधी आपल्याला असा प्रश्न पडतो की मांसाहारी व्यक्ती भगवंतांचे पूजन करतात. पण खरोखर मांसाहारी व्यक्तींचे पूजन भगवंत स्वीकारतात का ? आज काल जवळजवळ सत्तर टक्के लोक मांसाहाराचे सेवन करतात. बहुतेक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात मांसाहाराचे सेवन करीत असतात आणि त्यानंतर भगवंतांचे पूजन करतात.

मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत की मांसाहारी व्यक्तींचे पूजन भगवंत स्वीकारतात का… याविषयी आपले धर्मग्रंथ कंद पुराण व भगवद्गीतेमध्ये संपूर्ण वर्णन आलेले आहे.

मित्रांनो, स्कंध पुराणाच्या काशी खंडातील तिसऱ्या अध्यायात मांसाहारी व्यक्तींचा धिक्कार केलेला आहे. मांसाहारी व्यक्तीला मृत्युलोकात तर कधीच कोणतेही सुख मिळतच नाही. परंतु मृत्यूनंतर दुसऱ्या लोकांतही कधीच सुख मिळत नाही. त्या बरोबरच स्कंद पुराणात एका प्रसंगाचे वर्णन केलेले आहे त्यामध्ये सांगितलेले आहे ज्यावेळी सर्व देवी-देवतांनी काशी मध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी बघितले की तेथे वाघ आदी मांसाहारी प्राणी गवत चारा खात आहेत.

त्याबरोबरच त्यात असेही म्हटलेले आहे हे भुकेमुळे एखादा मनुष्य प्राण्याचा मृत्यू जरी होत असेल तरीसुद्धा त्याने कधीही मांस खाऊ नये. इतकेच नाही तर जी व्यक्ती मांस किंवा दारूचे सेवन करतात त्यांचे पूजन भगवंत कधीच स्विकारत नाही.

हिंदू धर्मात मांसाहार करणे योग्य आहे की अयोग्य याविषयी अनेक व्यक्तींच्या मनात संभ्रम आहे. याचे मुख्य कारण हे आहे आपल्या धर्मग्रंथांमध्ये जे काही याबद्दल सांगितले आहे हे सर्वांना माहीतच नाही.

काहीजण असे म्हणतात की वेदांमध्ये मांसाहाराला योग्य सांगितलेले आहे. परंतु हे खरे नाही. वेदांमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे ही पशुहत्या किंवा पशुबळी पापाच्या श्रेणी येते.

भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की मनुष्याने काय खावे व काय खाऊ नये ते. श्रीकृष्ण सांगतात की मांसाहार हे तामसी भोजन आहे ज्यामुळे मनुष्याची बुद्धी क्षीण होते आणि मनुष्याचे त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण राहात नाही. त्यानंतर मनुष्याची इच्छा नसतानाही कितीतरी प्रकारची वाईट कृत्ये तो करू लागतो व पापाचा वाटेकरी होतो. अशा व्यक्तीने माझे पूजन किंवा नामस्मरण केले तरीही मी त्यांच्याजवळ अजिबात जात नाही.

त्याबरोबरच भगवद्गीते श्रीकृष्ण भगवान असेही म्हणतात की मांसाहारी भोजन हे राक्षसांसाठी आहे. मनुष्य प्राण्यांसाठी नाही.
भगवद्गीतेत श्रीकृष्णाने आहाराचे तीन वर्ग पाडले आहेत. सात्विक आहार राजश्री आहार व तामसिक आहार. त्यानुसार सात्विक आहार आयुष्य वाढवणारे, मनाला शुद्ध करणारे तसेच बुद्धी आरोग्य व तृप्तता मिळवून देणारे असते.

वेदांचे सार उपनिषद उपनिषदांचे सार गीता आहे त्यानुसार वेदांमध्ये मांसाहार करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आलेली आहे. वेदांमध्ये सांगितलेले आहे की ज्या व्यक्ती कोणत्याही प्राण्याचे किंवा इतर कोणत्याही पशुपक्ष्यांचे सेवन करतात त्याला आपल्या शरीराचा भाग बनवतात.

गोहत्या करून त्यांना गायीचे दूध व इतर पदार्थांपासून वंचित करतात त्या व्यक्तीसारखा पापी मनुष्य या पृथ्वीवरती कोणीही नाही.

वराह पुराणातही श्रीहरी विष्णूचा वराह अवतारात पृथ्वी मातेने त्यांना या विषयी प्रश्न केला होता त्यावेळी ते म्हणतात ज्या व्यक्ती मांसाहाराचे सेवन करतात त्यांना माझे भक्त मी मानत नाही.ज्या व्यक्ती कोणत्याही प्राणी किंवा पक्ष्यांचे मांस भोजन म्हणून खातात ते सर्वात मोठे अपराधी आहेत.

यजुर्वेदात असा उल्लेख येतो हे मनुष्याने सृष्टीतील भगवंतांनी जी रचना केलेली आहे त्या रचनेला आपल्या आत्म्यासमा मानावे. म्हणजेच आपण असे स्वतःला हित पाहतो तसेच इतरांचे हित पहावे.

गरुड पुराणात श्रीहरी विष्णू पक्षीराज गरुडाला एक कथा सांगताना म्हणतात की ज्या व्यक्ती मांसाहार करतात किंवा दारू मदिराचे सेवन करतात कोणतेही देवी-देवता त्या व्यक्तींचे पूजन स्वीकार करीत नाही. आणि अशा व्यक्तींचे कोणतेही देवी-देवता मदतही करीत नाही.

म्हणून नेहमी सात्विक अन्नाचे सेवन करावे म्हणजे आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनभर मृत्यूनंतरही भगवंतांचे साथ मिळत राहील व सुखपूर्वक आपण जीव लोकातून परलोकात जाऊ शकतो.

अथर्ववेदात म्हटलेले आहे हे मनुष्याने तांदूळ डाळ अन्नधान्य फळे इत्यादी वस्तूंचा खाद्यपदार्थ म्हणून वापर करावा. हाच मनुष्यासाठी सर्वात उत्तम आहार आहे.

मनुष्याने कधीही कोणत्याही नर किंवा मादीची कधीही हिंसा करू नये. ज्या व्यक्ती नर किंवा मादी यांच्या अंडे किंवा मांसाला कच्चे किंवा शिजवून खातात त्यांचा विरोध करावा.

तसेच ऋग्वेदातही म्हटलेले आहे गाय ही जगताची माता आहे आणि गायीचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. मनुष्याने आपल्या प्रमाणे सर्व प्राणिमात्रांचे ही रक्षण करायला हवे. म्हणून जर आपण भगवान भगवान त्यांच्या भक्तीवर विश्वास ठेवत असलो तर मांसाहार करणे बंद करावे. तसे ही मांसाहाराला मांसाहार करणाऱ्या मनुष्याला कितीतरी प्रकारच्या रोगांनी पीडित करतो व शरीराला हानी पोहोचवतो.

तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की मांसाहार करणे व मांसाहार करणाऱ्या व्यक्तींचे पूजन भगवंत स्वीकारतात की नाही ते …

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं ध श्र द्धे ला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *