मित्रांनो आज आपण या महिन्यातच लक्ष्मी मातेची पूजा कशा पद्धतीने करायचे आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये कोणते उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होईल याबद्दलच सविस्तर पणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
चैत्र प्रतिपदा म्हणजे हिंदू नविन वर्ष प्रारंभ, गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री यामुळे सण उत्सवाची ही खरी सुरवात असते. फळांचा राजा आंबा याच काळात मोहरतो आणि आपल्या रसाळ फळांनी खवैयांना आकर्षून घेतो. चैत्राचे दिवस म्हणजे गावोगावी होणाऱ्या जत्रा,यात्रांचे दिवस.बहुतेक साऱ्या ग्रामदेवतांच्या यात्रा चैत्रातच असतात.
चैत्र हा हिदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. चैत्र महिना म्हणजे रखरखत्या उन्हात एक नव्या बहाराची चाहूल. या महिन्यात पान गळती होऊन नवी चैत्रपालवी मनास आनंद देऊन जाते.
मित्रांनो महिनाभर लाडक्या माहेर वाशिणीच्या रूपाने चैत्र गौरीचे घरोघरी आगमन होते. पूजेतील अन्नपूर्णा आसनांवर बसवून तिची पूजा केली जाते. तिला नैवेद्य दाखवून जवळच्या सुवासिनींना हळदी-कुकुंवासाठी निमंत्रण दिले जाते.
या वर्षी चैत्र नवरात्र २ एप्रिल पासून प्रारंभ होईल आणि १० एप्रिल पर्यंत चालेल आणि या काळात वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या मान्यता आणि अनुष्ठान विधी केले जातात. बरेच लोक चैत्र नवरात्री मध्ये अखंड ज्योत पेटवतात, तोरण किंवा बंदरबन ठेऊन पूजा करतात, संपूर्ण ९ दिवस उपवास करतात.
या दिवशी कलश स्थापना करून पूजा सुरू करतात. नवरात्रीच्या सर्व दिवसांमध्ये सूर्योदयापूर्वी उठून गंगा नदीत स्नान करावे. जर असे करणे शक्य नसेल तर, तुम्ही आंघोळीच्या पाण्यातच गंगा जलाचे काही थेंब टाकून स्नान करू शकता. असे केल्याने मागील जन्मातील सर्व पापे धुतली जातात असे म्हणतात.
त्याच बरोबर मित्रांनो चैत्र नवरात्रीत अनेक जण घटस्थापना करून शारदीय नवरात्रीप्रमाणे घटाचे पूजन करतात. परंतु तुमच्याकडे चैत्र नवरात्रीत घट पुजण्याची प्रथा नसली, तरी नवरात्रीचे नऊ दिवस पाण्याने भरलेला कलश, घट घराच्या ईशान्य कोनाड्यात ठेवावा.
वास्तुशास्त्रानुसार ही दिशा पूजेसाठी शुभ असते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते आणि चैत्र नवरात्रीत अखंड ज्योतीचे विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोनात म्हणजेच दक्षिण-पूर्व अखंड दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने रोग दूर होतात असे वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात. यासोबतच शत्रूपासूनही सुटका मिळते.
या चैत्र नवरात्रीच्या काळात लक्ष्मीची पूजा केली जाते. चैत्र नवरात्रीच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत. तसे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकृष्ट होते आणि यासोबतच धन-संपत्तीतही वाढ होते.
चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भरलेला मंगल कलश नवमीच्या दिवशी फुलझाडांना पाणी घालून रिता करावा. तत्पूर्वी आम्रपल्लव घेऊन कलशातले पाणी घराच्या सर्व कानाकोऱ्यात शिडकावे. त्यामुळे घरातील वातावरण मंगलमय आणि पवित्र होते, तसेच नकारात्मक शक्ती निघून जातात.
नवरात्रीचा उपास किंवा दैनंदिन पूजा करणाऱ्यांनी चैत्र पंचमीला म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कुमारिके ला आणि अष्टमी-नवमीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीला तसेच ज्येष्ठ महिलेला बोलवून जेवू घालावे. यथाशक्ती दान करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
आपल्या घरात अतिथी रूपात आलेल्या लक्ष्मी मातेचे उष्ट सांडल्याने भरभराट होते आणि तसेच चैत्र नवरात्रीत हळद कुंकू समारंभ आयोजित करून सुवासिनीची ओटी भरावी आणि त्या ओटीतील थोड्या अक्षता प्रसाद म्हणून आपल्या तांदुळाच्या डब्यात टाकाव्यात. त्यामुळे अन्नपूर्णेचा आशीर्वाद लाभून घरात कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.