मित्रांनो, एक एप्रिल शुक्रवारचा दिवस आहे या दिवशी दर्श अमावस्या आहे. हिंदू धर्मात सर्वच अमावस्या महत्त्वा च्या असतात .परंतु दर्श अमावस्याचे एक विशेष महत्व आहे. या दिवशी पूर्वजांची पूजा करण्याचे महत्त्व आहे. कालसर्प दोष निवारणासाठी देखील हा दिवस श्रेष्ठ असल्याचे मानले गेले आहे. पुराणानुसार अमावस्येला स्नान दान करण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी गंगा स्नान केल्याचे देखील विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही गंगास्नान करू शकत नसेल, तर जवळच्या एखाद्या नदीमध्ये किंवा तलावांमध्ये देखील जाऊन आंघोळ करू शकता किंवा हे देखील शक्य नसेल, तर आपल्या घरातच अंघोळीच्या पाण्यामध्ये पवित्र गंगाजल टाकून आपण त्या पाण्याने अंघोळ केली तरी आपल्याला गंगा स्नानाची पुण्य प्राप्त होईल पितृदोष निवारण्यासाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.
या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यामुळे यादिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण अवश्य करावे जेणेकरून त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. अमावस्येच्या दिवशी अनेक उपाय केले जातात. आपल्या जीवनातील दुःख दारिद्रय दूर व्हावे यासाठी अनेक उपाय शास्त्रांमध्ये सांगितले आहेत आणि यापैकी बरेच उपाय अमावस्येला केले जातात. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तर असाच एक उपाय आपण जाणून घेणार आहोत जो अमावस्येला करायचा आहे.
आपल्या घराचा उंबरठा त्यामध्ये लक्ष्मीचे निवास असते. त्यामुळे दररोज तुम्ही सकाळी उठल्यानंतर त्या उंबरठ्याला हळद-कुंकू नये पूजा करावी. त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे वास असेल. त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे दररोज त्याची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु काही लोक आताच्या काळात करायचे विसरून गेलेले आहेत. परंतु या नंबर त्याचा खूप महत्त्व आहे. ज्यामुळे आपल्या घरासाठी सुख शांती साठी महत्त्वाचे आहे.
मित्रांनो घराचा उंबरठा खूपच महत्त्वाचा मानला जातो. वास्तु शास्त्रानुसार घराच्या उंबरठ्यावर माता लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो त्यावे ळी घराचा उंबरठा देखील स्वच्छ करून त्याची पूजा करावी. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना हळद-कुंकू अर्पण करावे ज्या घरामध्ये ही विधी दररोज केले जाते तिथे माता लक्ष्मी नेहमी निवास करते.
आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती घरात प्रवेश करते. ती उंबरठ्या मधूनच आत येते. त्यामुळे वाईट शक्तीने आपल्या घरात प्रवेश करू नये नकारात्मक ऊर्जा आपल्या घराबाहेरच राहावी आणि फक्त सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करावा. यासाठी चा एक खास उपाय आपल्याला दर्श अमावस्या ला करायचा आहे.
दर्श अमावस्या प्रारंभ होत आहे गुरुवार 31 मार्च रोजी सायंका ळी सात वाजून 25 मिनिटांनी आणि याची समाप्त होत आहे. 1 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजून त्रेपन्न मिनिटांनी तर या कालावधीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे च गुरुवारी सायंकाळी हा उपाय करू शकता.
जेव्हा अमावस्या प्रारंभ होईल. साडेसात नंतर सायंकाळी तुम्हाला उपाय करू शकतात किंवा शुक्रवारी सकाळी बारा वाजण्याच्या आत देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्या सोयीनुसार जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता आपण जाणून घेऊया हा उपाय काय आहे. मित्रांनो या उपायासाठी आपल्याला हळद आणि गोमूत्र लागणार आहे. एका वाटीमध्ये
थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये गोमूत्र टाकायचे आहेत आणि ते मिश्रण बनवून घ्यायचे आहेत. हे मिश्रण बनवल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य प्रवेशद्वार आहेत. त्या उंबरठ्यावर या हळदीचा लेप द्यायचा आहे तुमच्या घराचा जो उंबरठा आहे त्यावर पूर्णपणे हळद लावून घ्यायचे आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल माता लक्ष्मी तुमच्या घरा कडे आकर्षित होईल. तुमच्या जीवनात काही समस्या दुःख दारिद्र्य आहेत ते नष्ट होईल. असे उपाय जुन्या काळामध्ये देखील केले जात होते. पण काळानुसार आपल्याला त्याचा विसर पडला आहे हे उपाय किती महत्त्वाचे आहेत हे देखील आपण विसरून गेलो आहोत. त्यामुळे शास्त्रांमधील या उपायांचा आपण अवश्य लाभ घ्यावा आपल्या जीवनामध्ये कष्ट आणि मेहनत करायची आहे.
पण त्यासोबतच जर आपण शास्त्रांमध्ये हे काही उपाय केले. तर आपल्याला यश नक्की प्राप्त होईल तर तुम्ही देखील दर्श अमावस्या ला हा सोपा उपाय अवश्य करा.
अशाप्रकारे जर तुम्ही हा उपाय करून बघितला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. या उपायांमुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे समस्या दूर होऊन तुमचे जीवन आनंदित जाईल हा उपाय प्रभावशाली आहे. हा उपाय फायदेशीर आहे. त्याचा उपयोग तुम्हाला सहजपणे करता येईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंध श्रद्धेशी सं’बंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्या साठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शे’अर करायला विसरू नका.