श्री दत्त यांना ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे एकरूप मानलं जात असल्याने त्यांना तीन तोंड, सहा हात, दोन पाय, असून त्यांच्या भोवताली चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनु बसली आहे. श्री दत्त गुरु यांना हिंदू धर्मातील पहिले गुरु मानलं जाते. हिंदू धर्माची पताका आपल्या हाती घेऊन त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केले त्यामुळे आज आपणास देशाच्या अनेक भागात दत्त संप्रदाय पाहायला मिळतो. श्री दत्त यांच्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती यांना श्री दत्त यांचे अवतार मानलं जाते.
दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे ५२ ओळींचे संकटविमोचन स्तोत्र आणि या स्तोत्राची रचना संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. सईज या गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशालेमधे या स्तोत्राची रचना झाली आणि मूळ दत्तबावनी गुजराती आहे. श्री दत्त यांचा जन्म ऋषी अत्री यांच्या पत्नी अनसूया यांच्या पोटी झाला होता.
त्याचबरोबर मित्रांनो या भावनेचे वाचन करत असताना सर्वात आधी दत्त बावन्नीचा एक पाठ सकाळी स्नान झाल्यावर म्हणावा. एकदा म्हणायला फक्त ४/५ मिनिटं लागतात. तसेच संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पण घरी आपण म्हणू शकता. ज्या मुळे ज्ञात अज्ञात दुष्ट शक्तींचा नाश होऊन, घरांतील वातावरण मंगलमय होते, घरांत सुख-समाधान नांदते आणि त्याचबरोबर दत्त बावन्नी आपण कुठेही म्हणू शकता. एखाद्या देवळात, एखाद्या मठांत, किंवा अगदी आपल्या घरी देवघरात बसून पण म्हणू शकता.मित्रांनो सोयर व सूतक असताना जर गुरूवार आला तर त्या गुरुवारी दत्त बावन्नी म्हणू नये.
त्याचबरोबर दत्त बावन्नी हे स्तोत्रं आबाल-वृद्धांनी, स्त्री-पुरुष, कोणीही म्हटलं तरी चालते आणि त्यास कोणतेही बंधन नाही, स्त्रियांनी ५२ गुरुवारी ५२ पाठ अनुष्ठान करण्याचा जर संकल्प केला असेल तर मासिक धर्म पालनात जर गुरुवार आला तर तो गुरुवार सोडून पुढील गुरुवार संख्येत धरावा, मासिक धर्मात दत्त बावन्नीचे पठण अजिबात करू नये दत्त बावन्नीचे अनुष्ठान करताना सुवासिक धूप किंवा सुवासिक अगरबत्ती असे जे काही आपल्याकडे उपलब्ध असेल ते अवश्य लावावे आणि आपण दत्त बावन्नी म्हणताना लावलेल्या अगरबत्तीचा धूपाचा अभिमंत्रित झालेला अंगारा एका डबीत नीट
जपून ठेवावा.
मित्रांनो दत्त बावन्नी ह्या स्तोत्राचे जरी ५२ गुरुवारी अनुष्ठान करायचे असले तरी त्याची सांगता झाल्यावर कोणतेही उद्यापन करायचे नाही. त्या बाबत पू. बापजींनी कुठेही लिहिलेलं नाही आणि शक्य असल्यास ५२ गुरुवारी ५२ पाठ केलेली सेवा एखाद्या दत्तस्थानी, दत्त मंदिरात, गुरुस्थानी जाऊन समर्पित करावी. अशीच अखंड सेवा करण्याचा संकल्प मनी धरून दत्त बावन्नीची अखंड पणे सेवा करत रहावी आणि आपण दत्त बावन्नी हे स्तोत्र नित्य उपासनेत ठेवावं. रोज सकाळ किंवा संध्याकाळी किमान १ तरी पाठ शांत पणे म्हणावा. पुढे दत्त बावन्नी स्तोत्राचे गुजराती शब्द तोंडाला लागले, हळू हळू दत्त बावन्नी पाठ झाली की किमान रोज १३ पाठ म्हणावेत.
आणि हळू हळु दत्त कृपेने आपल्याला प्रेरणा झाल्यास ५२ गुरुवारी न चुकता ५२ पाठ म्हणण्याचा म्हणजेच दत्त बावन्नीचे एक वर्ष भर अनुष्ठान करण्यास सुरुवात करावी आणि मूळ गुजराती भाषेतील दत्त बावन्नी सध्या मराठी-इंग्रजी व अन्य भाषेत देशाविदेशातील दत्त भक्त म्हणत आहेत आणि वाचनासाठी भाषा मराठी पण उच्चार गुजराती होणार असतील तर देवनागरी लिपीत लिहिलेली दत्त बावन्नी अवश्य म्हणावी.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!