स्वामी भक्ती आपल्याला हेच सांगते की वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडं अजिबात लक्ष देऊ नका. पण ज्यांनी कोणी वाईट वेळेत आपली साथ देऊन आपल्याला आपली चांगली वेळ आणून दिली आहे त्यांचे मोल कधीही विसरू नका. तुमच्या चांगल्या वेळेत तुमच्या पाठीमागे खूप लोक उभे राहतील कारण त्यांना तुमचं यश नाही तर तुमच्या मागं मिळणारा मेवा महत्त्वाचा असतो.
पण याच उलट संकट काळात जी लोक तुमच्या हातात हात देऊन उभ राहतात. तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात त्या लोकांना तुम्ही कधी विसरू सुद्धा नका. त्या लोकांच्या उपकारांची जाणीव तुम्ही आयुष्यभर ठेवा.
कारण ज्यावेळी कुणी नव्हतं त्याचवेळी फक्त तीच लोक तुमच्या सोबत होते. आणि तुम्हाला खरच सांगतो जे लोक संकटात तुमच्या बाजूने उभे असतात, तुमच्या सोबत उभे असतात ते खऱ्या अर्थाने आपल्या देवाचं रूप असतात.
म्हणूनच म्हणतो की श्री स्वामी समर्थ आपल्या सोबत नेहमीच असतात. मग ते कोणत्याही रूपातून असतील, कोणत्याही रूपातून प्रत्येक अडचणीत आपल्याला मदत करतील. फक्त आपल्याला स्वामींना ओळखता आलं पाहिजे इतकचं. श्री स्वामी समर्थ.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद