चैत्र नवरात्रीत देवीची ओटी भरताना या गोष्टींची काळजी घ्या, घरावर सदैव देवीची कृपा राहील, सौख्य नांदेल.

मित्रांनो ओटी भरणे, हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संततीप्राप्त व्हावी, म्हणून तिची ओेटी भरली जाते. ‘संतती प्राप्ती’ च्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो.

त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून देखील लक्ष्मी मातेची या चैत्र नवरात्री दिवशी ओटी भरली जाते. नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसचं घरात जी घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते. ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

हिंदू नववर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होतं. तेव्हाच चैत्री नवरात्रही साजरं केलं जातं. यंदा दोन एप्रिल म्हणजे गुढीपाडव्यापासून चैत्री नवरात्राची सुरुवात होत आहे. हे चैत्री नवरात्र 11 एप्रिल रोजी संपेल आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या तील अनेक जण या नवरात्राआधी घराची साफसफाई करतात. या दुर्गामातेची, शक्तीची आराधना करण्यात येते. आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी लक्ष्मी मातेची ओटी ही भरली जाते आणि पूजेबरोबरच त्याचंही फळ निश्चित मिळेल असं म्हटलं जातं.

कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. एका ताटात साडी ठेवावी. आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

आणि साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा. याऐवजी आपण लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग निवडू शकता. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल, सोनेरी किंवा इतर. तसचं संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोपर्‍याची वाटी ठेवावी. हळद-कुंकु, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ आणि खडी साखर देखील असावी आणि मित्रांनो आपल्यातील अनेक लोक 5 वाण ठेवतात. ज्यात हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो.

त्याचबरोबर ज्यावेळी आपण लक्ष्मी मातेची ओटी भरणार आहेत त्या वेळी नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्तवाचं आहे. याला तांबूळ असं म्हणतात. यात सुपारी, तंबाखू नसावा. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत. मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाष्णीला पण देऊ शकता. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून घ्यावे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *