मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही चित्र अतिशय खास मानली जातात. वास्तूमध्ये काही वस्तू ठेवण्याचा विशेष फायदाही होऊ शकतो. असे म्हटले जाते की काही चित्र घरात लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा तर वाढतेच, शिवाय तुम्हाला भाग्याची साथ देखील मिळेल. आणि घरामध्ये येणाऱ्या पैशांचा ओघ आणि प्रभावही वाढतो. चला तर ती चित्रे कोणती आहेत हे जाणून घेऊयात.
जर आपली वास्तु चुकीची असेल तर वातावरणातील असंतुलित ब्रम्हांडिय ऊर्जा घरामध्ये वास्तुदोष निर्माण करते आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे आपले आरोग्य, संपत्ती, शिक्षण, करियर, नोकरी, लग्न, व्यवसाय इत्यादींशी संबंधित समस्या उद्भवायला सुरुवात होते. म्हणूनच त्या ऊर्जेमध्ये संतुलन कसं ठेवायचं हे समजून घेणं अधिक आवश्यक आहे. यासंदर्भात सविस्तर असे वर्णनवजा माहिती आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये देखील मिळते.
वास्तुशास्त्रानुसार घरात फिश टँक घरात ठेवणे सगळ्यात शुभ मानले जाते. परंतु तुमच्या घरात फिश टँक बसवणे शक्य नसेल तर फिश टॅंक चा फोटो व माशांचे चित्र तुम्ही घरामध्ये लावू शकताय. लक्षात ठेवा अशी चित्रे दरवाज्याच्या डाव्या बाजूला किंवा घराच्या उत्तरेकडील भिंतीवर लावावी.
ही दिशा संपत्तीची दिशा मानली जाते आणि इथे माशांचे चित्र लावल्याने तुमच्या संपत्तीत वृद्धी होते. तुमच्या घरातील किंवा ऑफिस मधील अडचणी संपण्याचे नाव घेत नसेल तर तुम्ही कोकरू म्हणजे मेंढीच चित्र लावू शकतात. असे केल्याने तुमचे भाग्य बदलते आणि समस्या देखील कमी होतात.
आपल्या घरांमध्ये उंच पर्वताचे चित्र लावल्याने आपली प्रगतीच प्रगती होत असते. उंच पर्वत आपल्या घरामध्ये शुभ ऊर्जेचा संचा र वाढवतात. पर्वतांचे फोटो काढताना एक गोष्ट लक्षात ठेवावी या चित्रांमध्ये पाण्याचे दृष्य नसावे. असे म्हणतात की अशी चित्र नैऋत्य भिंतीवर लावल्याने आपल्या जीवनात समाधानाची भावना येते, आणि आपला आत्मविश्वासही वाढतो. तसेच शक्तीही वाढते.
तसेच आपल्या घरामध्ये आक्रमक आणि हिंसक प्राण्यांचे फोटो लावणे निषिद्ध मानले जाते. परंतु वास्तूशास्त्रा मध्ये पांढरा वाघ शुभ मानला जातो. पश्चिमेच्या भिंतीवर पांढऱ्या वाघाचे चित्र लावल्याने आपल्या घराची वाईट नजरेपासून संरक्षण होते. आपल्या घरावर कोणत्याही प्रकारची काळी जादू चा प्रभाव होत. नाही त्याचबरोबर आपल्या घराला कोणाची वाईट नजर ही लागत नाही.
असे म्हटले जाते घरामध्ये गरुड पक्षाचे फोटो लावणे वास्तु शास्त्रा नुसार खूपच शुभ आणि चांगले मानले जाते. अध्यात्माच्या दृष्टि कोनातूनही गरुड पक्षी अत्यंत शुभ मानला जातो. आपल्या घरा मध्ये गरुड पक्षाचा फोटो लावल्याने आपली संपत्ती बळ आणि संयम यात वृद्धी होते. असा फोटो घरामध्ये लावल्याने सकारात्मक उर्जेचा संचार वाढू लागतो.
तुम्ही गरुडा वरती विराजमान असलेले श्रीहरी विष्णूंचा फोटो देखील लावू शकतात. वास्तुशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे घरात वाहत्या पाण्याचे चित्र असणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की असे चित्र घरात लावल्याने आपले प्रत्येक काम विनाअडथळा पूर्ण होते. आणि घरातील सदस्यांची नशीबही बळकट होते. असे म्हटले जाते की समुद्राच्या निळ्या पाण्याचे चित्र घरात लावल्याने सुख शांती आणि समृद्धी वाढते आणि त्याचबरोबर धनसंपत्तीतही वृद्धि होत असते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!