धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग बनल्याने ‘या’ राशींचे दार ठोठावेल लक्ष्मी; तुम्हाला कोणत्या रूपात मिळणार धन?

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी धनदात्री माता लक्ष्मी व आरोग्यदेवता धन्वंतरीचे पूजन केले जाते. यंदा १२ नोव्हेंबरला दिवाळीचे लक्ष्मी पूजन आहे व त्याआधी दोन दिवस म्हणजेच १० नोव्हेंबरला धनत्रयोदशीची तिथी आहे. हा दिवस त्याच्या महत्त्वानुसार तसाही अत्यंत शुभ मानला जातो मात्र यंदा धनत्रयोदशीला ग्रहमान सुद्धा अत्यंत अनुकूल असणार आहे.

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार यंदा धनत्रयोदशीला चंद्र हा कन्या राशीत गोचर करणार आहे. कन्या राशीत धन व वैभवाचे कारक शुक्र देव अगोदरच विराजमान आहेत. शुक्र व चंद्राच्या एकत्र येण्याने १० नोव्हेंबरला कलात्मक राजयोग निर्माण होत आहे. हा दिवस हस्त नक्षत्रात येत असल्याने व शुभ राजयोगामुळे धनत्रयोदशी हा आणखीनच शुभ मुहूर्त असणार आहे.

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, २७ नक्षत्रांपैकी हस्त नक्षत्र हे १३ वे नक्षत्र असून याचा स्वामी चंद्र स्वतः आहे. व्यावसायिकांसाठी हा अत्यंत शुभ मुहूर्त असून धनत्रयोदशीला काही विशिष्ट राशींना प्रचंड धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. माता लक्ष्मी या राशींवर प्रसन्न असेल ज्यामुळे केवळ मिळकतच वाढणार नाही तर तुमच्याकडील धनसंचय सुद्धा उत्तम प्रकारे गुंतवता व वापरता येऊ शकेल. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना कोणत्या रूपात धनलाभ होऊ शकतो हे पाहूया…

धनत्रयोदशीच्या दुर्मिळ राजयोग; ‘या’ राशींना प्रचंड मोठा धनलाभ होणार?
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
कर्क राशीच्या भाग्यस्थानात कलात्मक राजयोग प्रभावी असणार आहे. या राशीत सध्या राहू सोबत नेपच्यूनची उपस्थिती असणार आहे. एकूण हा योग नवमस्थानात खूपच शुभदायक ठरणार आहे. प्रॉपर्टी संबंधातील कामे मार्गी लागतील. जुनी येणी येतील. एकूण या काळात खूपशा गोष्टी छान मार्गी लागतील . आरोग्यात सुधारणा होईल तर उद्योगधंद्यात नोकरीत कामाचा आवाका सांभाळण्याची उर्जा प्राप्त होईल. विशेष म्हणजे मनाचा उत्साह वाढेल. तसेच कयम होणारा विरोध अडचणी हळूहळू कमी होत जातील.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
स्वतःसाठी वेळ काढाल. आपल्यातील कलागुणांना वाव मिळेल. नोकरी व्यवसायात महत्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञ मंडळींचा सल्ला लाभकारक ठरेल. आत्मविश्वास बळावणे जरुरीचे आहे.तुमच्या स्वतःच्या एखाद्या व्यव्यसायातून प्रचंड मोठा नफा होऊ शकतो. पैसे गुंतवण्यावर अधिकाधिक भर द्या. आर्थिक मिळकत वाढताना वैवाहिक आयुष्यात सुद्धा सुखाचे चांदणे पसरू शकते ज्यामुळे मानसिक आरोग्यात सुधारणा होऊ शकते. तुम्हाला जोडीदाराकडून प्रचंड पाठबळ मिळू शकतं. यातून धनलाभाचे दार सुद्धा उघडेल .

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
कलात्मक राजयोग जुळून येत आहे पण त्याच वेळी शनी आणि गुरूचे उत्तम पाठबळ असल्याने मोठमोठी कामे हातावेगळी कराल. नोकरी व्यवसायात नव्या जबाबदाऱ्यांना संपूर्ण न्याय द्याल. चिकटीची दाद मिळेल. विद्यार्थी वर्गाला ग्रहयोग पूरक आहेत. उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असल्यास संधी सोडू नका. नोकरी व्यवसायात आपले अंदाज खरे ठरतील. कामानिमित्त प्रवास कराल. हुरूप वाढेल. तुम्हाला सोन्याच्या रूपात धनलाभ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *