धर्मनाथ बीजेचे महत्व – माघ महिन्यातील द्वितीया, तिला धर्मनाथबीज असें म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. यादिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता.
धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा – या दिवशी आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल तर त्याठिकाणी श्री नवनाथांचे प्रतिमेचे पुजन करावे. हार-पुष्प अर्पण करावे. धुप-दिप दाखवावा. व श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथातील ३४ वा अध्याय पठण करावा. त्यानंतर
नैवेद्य दाखवुन नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबील, घेवड्याची भाजी, हरबऱ्याच्या घुगऱ्या , मलिदा, वडे, ई. नैवेद्यही अर्पण करु शकता. आजची विशेष सेवा – आज 2 फेब्रुवारी रोजी धर्मनाथ बीज दिन आहे. आज घरामध्ये
कोणीही एकाने तरी 900 श्लोकी नवनाथ ग्रंथ वाचावा. दिवसभरात कोणत्याही वेळी वाचावे. यासाठी कोणतेही नियम नाहीत. मांसाहार करून वाचू नये आणि काळे वस्त्र घालून वाचू नये. प्रत्येक ओवीला शाबरी मंत्र “ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम:” या मंत्राच संपूट लावून ग्रंथ वाचन केला तर उत्तमच. ज्यांच्याकडे ग्रंथ नसेल त्यांनी
pdf मधून वाचन करावे किंवा u tube वरती संक्षिप्त नवनाथ लावून श्रवण करावे. काही वृद्ध सेवेकरी असतात ज्यांना वाचन नाही होत मग त्यांनी किमान 11 माळी शाबरी मंत्र म्हणावा किंवा जास्तीत जास्त 51 माळी म्हणावा. आणि
नवनाथांना घराच्या संरक्षणासाठी विनंती करावी. नवनाथांची सेवा करताना उदबत्ती, धूप, दीप लावावी. उदबत्तीची, धुपेची साठलेली रक्षा सर्व घरामध्ये टाकावी.
“श्री स्वामी समर्थ”
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!