वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक समस्येचे निराकरण वर्णन केले आहे. मग तो व्यवसायात असेल किंवा घरातल्या आपत्तीशी संबंधित गोष्टी. वातावरणामध्ये अशा ऊर्जा असतात की त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. मग त्या ऊर्जेचा नाश करण्यासाठी दुसरी ताकतवान ऊर्जा तिथे आली तर पहिली ऊर्जा निकामी होते, मग ह्या अशाच काही सकारात्मक ऊर्जा असतात, त्या आपल्या जवळपासच्या नकारात्मक ऊर्जा पळवून लावतात.
कुठून मिळतात ह्या सकारात्मक ऊर्जा ? तर घरात भरपूर सूर्यप्रकाश, काही मनाला आनंद देतील आशा गोष्टी, काही शक्ती देतील अशा गोष्टी जर घरात आणल्या तर ह्या नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव नष्ट होतो घरातलं वातावरणच बदलून जातं. सगळं काही ‘परफेक्ट’ होऊन जातं.
मग असले सकारात्मक बदल कोणाला आवडणार नाहीत? काय करायचं त्याच्यासाठी?
कोणतीही शक्ती मोजताना ती हॉर्स पावर मध्ये मोजली जाते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. विशेष म्हणजे गाड्यांच्या इंजिनाची शक्ती किती आहे, पाण्याची मोटर किती हॉर्स पावरची आहे. आपण असे व्यवहार करताना बघतो. मग ही अश्व शक्ती नक्की कसं आणि कुठे कामाला येते हे कदाचित सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही.
सूर्य हा सगळ्यात ऊर्जावान म्हणून त्याच्या ऊर्जेवर अनेक गोष्टी चालतात. सूर्याचं ऊन लागलं नाही तरी नुसत्या त्याच्या प्रकाशामुळे सावलीत सुद्धा झाडं उगवतात, मोठी होतात. सौर ऊर्जेवर घरातले पंखे, लाईट ,चालतात. त्यामुळे अशा शक्तीवान गोष्टींपासून आपल्याला ऊर्जा मिळते.
ग्रहण लागते त्यावेळी चंद्र सूर्य पृथ्वी एका रेषेत येतात त्यामुळे ही ऊर्जा कोणामुळे तरी अडली जाते आणि ती ऊर्जा काहीकाळ न मिळाल्यामुळे त्या ठराविक जागेवर परिणाम होतो , त्याला आपण हवा दूषित झाली असं म्हणतो. आणि ग्रहण सुटल्यावर ऊर्जा मिळते आणि पुन्हा सगळे व्यवस्थित होते.
अश्व हा शक्तीवान प्राणी म्हणून ओळखला जातो, मग ही शक्ती जर माणसाच्या अंगात आली तर माणूस सगळ्यात शक्तीवान ठरेल. पण तसे झाले नाही. सगळ्यांना वेगवेगळ्या शक्तीचं वाटप झालंय. ह्या हॉर्स पावर ला घरात ठेवायचं. अगदी टाच मारल्यावर धावतात तशा धावणाऱ्या घोड्यांचं एक मस्त चित्र, किंवा फ्रेम, घरात लावायची.
आता तुम्हाला नक्की काय त्रास होतोय हे घराच्या दिशेवरून ठरवतात आणि कोणत्या दिशेला हे चित्र लावलं की त्याचा चांगला परिणाम साधला जातो हे जाणकार दिशा निश्चित करून सांगतात. आपलं काय काम तर असं मस्तीत धावणाऱ्या घोड्यांचं चित्र आणायचं. कुठल्याही गिफ्ट स्टोअरमध्ये हे चित्र मिळतं.
आता ह्याच्यात सात घोडे असणारे चित्र पण असतं बरं का, ते जास्त चांगलं समजलं जातं, कारण सात आकडा बऱ्याच गोष्टीत असतो म्हणून सात आकड्याला महत्व ,सप्तरंगी, सप्तपदी, सप्तर्षी, सात नद्या. आता आपल्याला काय हवं आहे ते आपण ठरवायचं, नुसता घोडा पळताना पहिला तरी आपल्या अंगात एक प्रकारची शक्ती आल्यासारखे होते. मग ही चित्ररूपात शक्ती असली तरी सगळ्या घरात ही शक्ती राहील आणि सगळ्या नकारात्मक ऊर्जा पळून जातील.
मग नुसतं हे काम करून तर बघायला काय हरकत आहे? फायदा आपलाच होणार. कारण शुभ शक्तीकडून अशुभ शक्तीचा नाश होणार असेल आणि घरात आनंदी वातावरण तयार होणार असेल तर नक्कीच करू. घरातच काय, आपल्या ऑफिस मध्ये, दुकान असेल तर त्या दुकानात, इतर कामाच्या ठिकाणी सुद्धा जाणकारांचा सल्ला घेऊन लावायला हरकत नाही.
वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक समस्येचे निराकरण वर्णन केले आहे. मग तो व्यवसायात असेल किंवा घरातल्या आपत्तीशी संबंधित आहे. आपणही अशा प्रकारच्या समस्येने ग्रस्त असल्यास, धावणाऱ्या घोड्यांचं चित्र ठेवणं खूप फायदेशीर मानले जातं. कारण त्यांच्या वेगामुळे घोडे अडचणींवर मात करतात.
परंतु घोड्यांची छायाचित्रे काढताना हे लक्षात ठेवले पाहिजे की घोड्यांची संख्या फक्त 7 असावी. हे यापेक्षा कमी नसावे किंवा यापेक्षा अधिक नसावे. कारण इंद्रधनुष्यचे 7 रंग आहेत. सप्तऋषी विवाहात सात अंक, सात जन्म इत्यादींचे प्रतिनिधित्व करतात.
कार्यालयाच्या केबिनमध्ये धावणारे घोड्याचे चित्र लावावेत. जर आपण ही चित्रे घातली असतील तर लक्षात ठेवा की घोड्यांनी कार्यालयाच्या आत तोंड द्यावे आणि फोटो दक्षिण भिंतीवर लावावा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामास गती मिळते.
घोड्यांची छायाचित्र भिंतीवर टांगल्यास जीवनात चढ-उतार येत नाहीत. देवी लक्ष्मीची कृपा घरात बनून राहते. यासाठी घराच्या मुख्य हॉलच्या दक्षिणेकडील भिंतीवर घराच्या आतील बाजूस तोंड असलेल्या घोडाचे चित्र ठेवले पाहिजे.
जर एखादी व्यक्ती कर्जात बुडलेली असेल तर त्याने घर किंवा कार्यालयात कृत्रिम घोड्यांच्या जोडीला वायव्य दिशेने ठेवावे जर हे पेंटिंग असेल तर हे चित्र कधीही अस्पष्ट होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!