लठ्ठपणाचा अनुवंशिकतेशी मोठा सं’बंध आहे. लठ्ठ आई-वडिलांची मुलेही लठ्ठ होण्याची शक्यता बरीच जास्त असते. ज्या घरी पालकांचे वजन जास्त असेल, त्यांनी याविषयी सजग राहून, आपल्या मुलांना चांगली जीवनशैली द्यावी. अनुवंशिकता बदलता येत नाही; पण जीवनशैलीत आरोग्यदायी बदल नक्कीच करता येतात; जेणेकरून मुलांची वजन वाढ टाळता येईल.
आपल्या रोजच्या जेवणात पोषक घटक असलेल्या अन्नाचा समावेश केल्यानंतर जोपर्यंत आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही. आपण खालेल्या अन्नाचे पोषक घटक शरीरात शोषले जात नाही तोपर्यंत पोषण प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळेच जेवण केल्यानंतर
आपण कोण कोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजे या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जेवण केल्यानंतर या काही गोष्टी आपण लगेच केल्या तर आपले वजन वाढत, एसिडीटी होते, पोट फुगत, गॅस होतात, जळजळ होते म्हणूनच इथून पुढे आपण ह्या गोष्टी करणे थांबवू शकता. अन्न हे जेवढी आपल्याला भूक आहे तेवढेच खाण्याचा प्रयत्न करा प्रमाणापेक्षा जास्त अन्न खाल्याने अपचन होऊ शकते. जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा. चांगल्याप्रकारे पाचक रस निर्माण होण्यासाठी
जेवण करण्याआधी एक ग्लास पाणी आपण पिऊ शकता. तसेच जेवण केल्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटांनी आपण पाणी प्यायले पाहिजे. जेवण केल्यानंतर लगेचच धुम्रपान करणे टाळा. जेवण केल्यानंतर लगेचच झोपणे टाळा. तसे केल्याने अन्न पचन व्हायला अधिक वेळ लागतो. खाल्यानंतर लगेच झोपल्याने आपले वजन वाढू शकते. गॅस होऊ शकतात. आपल्याला जेवणानंतर लगेचच कोणकोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजेत.
जेवण केल्यानंतर आपण लगेच फळांचे सेवन करू नका. असे केल्याने फळांचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यापासून आपल्या कमी प्रमाणात पोषक घटक मिळतात. जेवणानंतर सुमारे एक तासा नंतर फळांचे सेवन आपण करू शकता. अथवा जेवण करण्याआधी काही वेळ आपण फळ खाऊ शकता.
जेवण केल्यानंतर आपण लगेचच चहा प्यायल्याने आपल्याला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. म्हणून जेवण केल्या नंतर लगेचच चहाचे सेवन करणे आपण टाळले पाहिजे.
आजच्या जीवनशैलीमध्ये शारीरिक कष्टांचा अभाव आहे. सध्या बहुतांश कामे ही बैठ्या पद्धतीचीच आहेत. लठ्ठपणाचे हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. पूर्वी घरी रोजची भरपूर कामे करताना, आपोआप व्यायाम होत असे.
जसे जात्यावर दळण काढणे, विहिरीवरून पाणी आणणे, घर सारवणे, उखळ-मुखळ वापरणे, गाड्यांचा वापर नसल्यामुळे भरपूर पायी फिरणे, या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनशैलीचा रोजचा भाग होत्या; त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत होती.
आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. अशी कष्टाची कुठलीही कामे रोज करावी लागत नाहीत. त्यामुळे रोज व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. लहान-मोठ्या सगळ्यांनीच रोज एक तास व्यायाम करावा. बैठी जीवनशैली बदलली, तर वजन नियंत्रणात आणता येईल.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!