द्रौपदीच्या या एका चुकीमुळे तिचे पाच पुरुषांशी लग्न झाले, जाणून घ्या कारण.

मित्रांनो द्रौपदीला पाच पती होते, ती पाच पांडवांची पत्नी होती. द्रोपदी ने एकदा श्रीकृष्णांना विचारले की, मी तुमच्याकडे एका चांगल्या पतीची मागणी केली होती, परंतु तुम्ही मला पाच पाच पती का दिले? मला तर एकच चांगल्या सुंदर पतीची आवश्यकता होती.

आपण अनेकदा महाभारतातील विविध कथा ऐकत आणि वाचत असतो. परंतु आपल्या पैकी बऱ्याच जणांना महाभारता सं’बंधित पडलेला एक मोठा प्रश्न असा आहे की द्रोपदीचे पाच पु’रुषांसो’बत लग्न कसे काय झाले? आणि यामागचे नेमके कारण काय आहे? याबद्दलची सविस्तर पणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपण भगवंतांकडे ज्या काही इच्छा व मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत असतो त्यापैकी बहुतांशी इच्छा भगवंत पूर्ण करत असतात. श्रीकृष्ण तिला म्हणाले की इतर सर्व तुझ्याच कर्माची फळं आहेत आणि तु जे मागितलं होत तेच तुला मिळाला आहे यामध्ये माझी काहीही चूक नाही. यावर द्रौपदी श्रीकृष्णांना म्हणाली की मी तर पाच पाच पतींची कधीही इच्छा व्यक्त केली नव्हती पण तरीही असं का घडलं.

यावर श्रीकृष्णांनी अगदी शांतपणे उत्तर दिले आणि ते म्हणाले की या जन्मी तु अशी इच्छा व्यक्त केली नव्हती परंतु मागच्या जन्मांमध्ये तू अशी इच्छा व्यक्त केली होतीस. मागच्या जन्मी तु एका ब्राह्मणाची मुलगी होतीस, त्यावेळी ब्राह्मण एका कामासाठी बाहेर चालले होते आणि त्यांनी तुला असे सांगितले होते की घरामध्ये जर कोणी पाहुणे वरती आले तर त्यांचे स्वागत कर, त्यांना खायला आणि प्यायला दे, परंतु त्यांच्याकडे कसलीही अ’पेक्षा आणि मागणी करू नकोस. असे सांगून तुझे बाबा इथून निघून गेले.

त्यानंतर थोड्या वेळाने एक दिव्य साधु महाराज तुमच्या घराकडे आले, व त्यानंतर तु त्यांचा पा’हुणचार अगदी व्यवस्थितरीत्या पूर्ण केला पण ज्यावेळी ते साधू महाराज परत जात होते त्यावेळी ते साधू महाराज तुला म्हणाले की बालिके तू माझा पाहून ज्या अगदी योग्य रीतीने केला आहेस त्यामुळे आता तुला पाहिजे तो वर तू माग. तुझ्या बाबांनी तुला कोणतीही मागणी करु नकोस असे सांगितले होते परंतु तू त्या साधू महाराजांना म्हणालीस, की मी ह्या जन्मी तर लग्न करणार नाही परंतु पुढच्या जन्मी लग्न करत असताना मला सुंदर, विद्वान शूर वीर व अतिर’मणीय आणि धा’डसी पती मिळावा.

ज्यावेळी तू साधू महाराजांना पाच वेळा सुंदर, विद्वान, शू’रवीर, अ’तिरमणीय आणि धा’डसी पती मिळावा म्हणून वर मागितला त्यावेळी साधुमहाराजांनी तुला आशीर्वाद दिला, आणि म्हणूनच तू पाच वेळा सांगितले की पती मिळावा, पती मिळावा, पती मिळावा, म्हणून तुला पाच पती मिळाले यातमध्ये मी काय करू शकतो तू जे मागितले तेच तुला मिळाले. मित्रांनो म्हणूनच देवाकडे किंवा भगवंताकडे कोणतीही गोष्ट मागत असताना ती विचार पूर्वक मागावी.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *