गाईला दररोज खाऊ घाला ही एक वस्तु, तुमची प्रत्येक इच्छा होईल पुर्ण..!!

मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गाईला देवतेचे स्वरूप मानले व गाईंमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असे देखील म्हटले जाते. त्यामुळे आपल्या जेवणातील किंवा आहारातील एक किंवा दोन भाकरी आपण गाईला खाऊ घातले पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पशु पक्ष्यांना अन्न किंवा पाणी खाऊ घातले की पुण्याची प्राप्ती होते असे ही म्हटले जाते.

मित्रांनो, आपल्या घरासमोर किंवा घराच्या आसपास आपल्याला अनेक प्राण्यांचे दर्शन होत असते, यामध्ये गाय-वासरू व इतर प्राण्यांचा समावेश असतो. पण अनेकदा आपण या प्राण्यांना हाकलून लावत असतो. जर आपल्या घरा समोर किंवा घराच्या आसपास गाय येत असेल, तर त्या गाईला भाकर खाऊ घालायचे आहे. आपल्या हिंदू संस्कृती मध्ये याला पुण्याचे काम मानले जाते.

मित्रांनो जर तुम्हाला गाई पाळणे शक्य असेल तर ही एक मोठे पुण्याचे काम आपल्या हातून होऊ शकते. कारण जर आपण जर एखादी देशी गाय पाळली तर त्यामुळे आपल्या अनेक पिढ्यांचे संरक्षण होण्यास मदत होते, असे ज्योतिषशास्त्रात नमूद केले गेले आहे. जर आपण घरामध्ये देशी गाय पाळली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम नांदते व आपल्या घरावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते.

ज्यावेळी आपण गाईला भाकरी खाऊ घालत असतो त्यावेळी भाकरीसोबत जर गूळ ही दिला तर आपल्याला जास्त पुण्याची प्राप्ती होते. पण ज्यावेळी आपण भाकरी व गुळ गोमातेला चारणार आहोत त्या वेळी गोमाता एका जागेवर बसलेली असावी म्हणजेच ज्या वेळी गोमाता उभी असेल त्यावेळी तिला भाकरी आणि गुळ चारू नये.

ज्यावेळी आपण गाईला एखादी भाकरी किंवा चपाती खाऊ घालत असतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण ते 33 कोटी देवताना नैवेद्य दाखवत असतो, त्यामुळे या सर्व देवी-देवतांची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायम राहते. गाईचं महत्त्व खूप मोठे आहे, दररोज गाईची पूजा आपल्याला केली पाहिजे, परंतु ते शक्य नसल्याने आपल्याला आपल्या घरापाशी किंवा घराच्या समोर गायीचे दर्शन होईल, तेव्हा आपण किमान एखादी तरी भाकरी तिला खाऊ घातली पाहिजे.

जर गोमातेला भाकरी खाऊ घालने शक्य नसेल तर चपाती करून त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ती गोमातेला खाऊ घातली तरीही चालेल. यामुळे आपल्याला मानसिक व शारीरिक सुख लाभेल, पण ज्यावेळी आपण गोमातेला भाकरी किंवा चपाती खाऊ घालणार असतो त्यावेळी अनेकजण आपण स्वतः जेवून मग उरलेले अन्न गोमातेला खाऊ घालतात, परंतु मित्रांनो हा गोमातेचा अपमान आहे.

अन्नग्रहण करण्यापूर्वी आपल्याला गोमातेला भाकरी खाऊ घालायचे आहे. जर आपण दररोज न चुकता एखादी भाकरी गोमातेला खाऊ घातली तर 33 कोटी देवी-देवतांना चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल, आपल्या घरातील सर्व संकटांपासून आपली मुक्तता होईल व आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *