पहिलं प्रे’म ❤❤

प्रे’म करायला, कुणाच्या मार्गदर्शनाची कोचिंग क्लासेसची ग’रज लागत नाही, अ ना हूतपणे एकमेकांचे विचार, म’ने जुळली कि झाले प्रे’म. माझे ही तसेच झाले, माझ्या प्रमाणे अनेकांचे झाले ही असेल. 

मी आणि ती एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच वर्गात माझ्या गावापासून तिचे गाव सहा किलोमिटर पुढे असल्याने, रस्ताही एकच आणि येण्याजाण्यासाठी बसही एकच. हा एक नि’व्वळ यो गायोग, सुरुवातीला तिच्या शेजारीही मी बसत नव्हतो, गाडीला ग’र्दी होत असल्याने मी ता’टकळत उभा राहायचो.

पंधरा- वीस दिवसानंतर तिला काय वाटले कुणास ठाऊक, तिने येतानाच, तिच्या शेजारी हातरुमाल टाकून जागा धरली, मात्र बसलो नाही, तिनेच बस ना, म्हटल्यावर अं’ग चो’र बसलो. आणि त्या दिवसापासून सुरू झाला आमच्या प्रे’माचा का’टेरी प्रवास.

एकाच बसमध्ये एकाच सिटवर बसून गप्पागोष्टीचे रुपांतर प्रे’मात कधी झाले, हे कळालेसुद्धा नाही, गप्पा कितीही गर्दी असली तरी मी बे’फिकीर असायचो, कारण माझी जागा धरणारी माझी ‘ती’ त्या गाडीत असायची. गप्पांच्या ओ’घात स्टँड कधि यायचे कळायचे ही नाही. 

हा प्र’वास संपूच नये असे वाटायचे. पण कोणत्याही गोष्टीस शे’वट हा ठरलेलाच असतो. आमच्या प्रे’माला ती बस तो वाहक, चालक, रोज येणारे विद्यार्थी सा’क्षिदार होते पहिल्या प्रे’माचे. रविवारी ती येत नसल्याने, म’न बे’चैन व्हायचे, सोमवारी तिला पहिल्याशिवाय क’रमत नसायचे, गोड हसायची आणि गोड बोलायची, शिक्षण संपल्यावर जि’वनसाथी बनण्याच्या आ’णाभा’का ही घेतल्या कॉलेज, कॉलेज कॅन्टीन, सगळीकडेच आमच्या प्रे’माच्या चर्चा आसायच्या, एस.टी.त प टवलेली पो’रगी म्हणून चि’डवायचे… 

प्रे’मप्रकरण वाढतच गेले, घरापर्यंत गेले आणि सुरू झाला काटेरी प्रवास.. तिचे कॉलेज बंद झाले, माझ्या बा’पाने, भावाने मुलीचा त’पास काढला, आणि प्रे’माला वि’रोध सुरू झाला. तिच्या घरच्यांनी तिच्या काही माझ्याबरोबर लग्न करण्याचे ठरवले. ते स्वत:हून घरी ही आले, पण माझ्या घरच्यांनी स्पष्ट शब्दांत न’कार दिला, मी काहीच बोलू शकलो नाही. 

अ’पराध्यासारख्या आमच्या नकारा नंतर मात्र तिच्या साठी स्थळ शोधू लागले. परीक्षा ही दिली नाही, शिक्षण आणि प्रे’म अर्ध्यावरच सुटले, माझ्यामुळेच. आणि तिचे लग्न झाले. आणि आठवले ते तिने केलेले पहिले प्रे’म. लग्नानंतर ब-याच महिन्यानंतर मी माझ्या गावच्या पाटीवर उभा होतो.

माझ्या बा’पाने मला टमटम घेऊन दिले होते, टमटम मध्ये बसलो असतानाच पांढ-या शुभ्र रंगाची एक अ’लिशान गाडी आली आणि पाटीवर थांबली, गाडीचे काच खाली झाले आणि त्यात ती दिसली. पांढ-या शुभ्र पंजाबीवर, बॉ’ब कट केलेली अगदी परिसारखी दिसणारं माझं पहिलं प्रे’म होतं ते…

मी मात्र मा’न खाली घातली तिच्याकडे पाहण्याचेही धा’डस झाले नाही, तिचा नवरा इं’जिनियर होता. तिचे चांगले झाल्याचे म’नोमन स’माधान होते. मी मात्र तिला धो’का दिला होता ती दिसली आणि पुन्हा पहिल्या वहिल्या प्रे’माची आठवण झाली. 

पोस्ट आवडल्यास शे’अर करा, धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *