सनातन हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवस विशिष्ट देवाला स’मर्पित आहे. तसेच आज बुधवार आहे व बुधवार हा गणेशाचा आवडता दिवस मानला जातो. आपण दररोज गणेशाची पुजा भक्ती करत असाल. मात्र आज केलेली उपासना गणेशाला प्रसन्न करण्यासाठी अधिक प्रभावी ठरते.
आजच्या लेखात आपण असेच काही प्रभावी मंत्र पाहणार आहोत. या मंत्राचा जप आपण आज सायंकाळी करावयाचा आहे. मंत्रजप करण्यापुर्वी हात पाय स्वच्छ धुवून देवघरासमोर आसनावर बसायचे आहे. यानंतर धुप-दीप प्रज्वलन करून गणेशाला कूंकू अक्षदा लावायचे आहे. मग हात जोडून खालील मंत्राचा जप करावा. या उपासनेमुळे आपल्याला जीवनात कसलीही कमी पडणार नाही. तसेच आपल्या संपूर्ण घरावर गणेशाची सदैव कृपा असेल. मंत्र पुढिलप्रमाणे…
अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम्
अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम् पूजितो यः सुरासुरैः
सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ।।
अरे मोरया, मोरया
अरे मोरया, मोरया नाम तुझे ।
कृपासागरा भक्ती हेचि माहेर माझे ।।
तुझी सोंड रे वाकडी एकदंता ।
मला बुद्धी दे मोरया गुणवंता ।।
गजवदन चतुर्थी
गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची |
पूजा बांधिली माणिका मोतियांची ||
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची |
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची ||
गणपति स्तोत्र
निर्विघ्नार्थं हरीशाद्या देवा अपि भजन्ति यम् ॥ मर्त्येः सवक्रतुन्डोऽर्च्य इति गाणेश संमतम् ।।१।। जगत्सृष्ट्यादिहेतुःसा वराश्रुत्युक्तदेवता ॥ गणानांत्वेति मंत्रेण स्तुतोगृत्समदर्षिणा ।।२।। इत्युक्तं तत्पुराणेऽतो गणेशो ब्रह्मणस्पतिः ॥ महाकविर्ज्येष्ठराजः श्रूयते मंत्रकृच्च सः ।।३।। मंत्रं वदत्युक्थमेष प्रनूनं ब्रह्मणस्पतिः ॥ यस्मिन्निन्द्रादयः सर्वे देवा ओकांसिचक्रिरे ।।४।। स प्रभुः सर्वतः पाता यो रेवान्यो अमी वहा ॥ अतोऽर्च्योऽसौ यश्र्चतुरो वसुवित्पुष्टिवर्धनः ॥५॥ वक्रतुन्डॊऽपि सुमुखः साधो गन्ताऽपि चोर्ध्वगः ॥ येऽमुनार्च्यन्ति ते विघ्नैः पराभूताभवंति हि ॥६॥ ये दूर्वान्कुरलाजाद्यैः पूजयन्ति शिवात्मजं ॥ ऐहिकामुष्मिकान् भोगान् भुक्त्वा मुक्तिन्व्रजन्ति ते ॥७॥
गणपती तुझे
गणपती तुझे नांव चांगले । आवडे बहु चित्त रंगले ।। प्रार्थना तुझी गौरी नंदना । हे दयानिधे! श्रीगजानना ।।
महागणपती स्तोत्र
श्रीगणेशाय नमः ॥ नारद उवाच ॥ प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं ॥ भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥ १॥ प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ॥ तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥ लंबोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ॥ सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥३॥ नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ॥ एकादशं गणपतिं द्वादशम् तु गजाननं ॥४॥ द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य यः पठेन्नरः ॥ न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥ विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं ॥ पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिन् ॥६॥ जपेद् गणपतिस्तोत्रं षडभिमार्सैः फ़लम् लभेत् ॥ संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥७॥ अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्र्च लिखित्वा यः समर्पयेत् ॥ तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥ इति श्रीनारदपुराणे संकटनाशनस्तोत्रं संपूर्णम् ॥
मोरया मोरया, आम्ही बालकाने । तुझीच सेवा करू काय जाणे ।। अन्याय माझे कोट्यानुकोटी । मोरेश्र्वरा! बा तू घाल पोटी ।।
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे । माथा शेंदूर झरे वरी बरे, दुर्वांकुरांचे तुरे ।। माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे । गोसावीसुत वासुदेव कवी रे, त्या मोरयाला स्मरे ।
प्रारंभी विनती करू गणपति विद्यादयासागरा । अज्ञानत्व हरूनि बुद्धीमति दे आराध्य मोरेश्र्वरा ।। चिंता, क्लेश, दारिद्रय, दुःख हरूनि देशांतरा पाठवी । हेरंबा, गणनायका, गजमुखा भक्ता बहु तोषवी ।।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!