स्वामी म्हणतात ज्या व्यक्तिंमध्ये असतात हे 4 गुण, गरिबी त्यांच्या घराचा रस्ताच विसरते.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या मानवी आयुष्यातील कडू आणि गोड अनुभवांमधून जे पण काही शिकले, त्याचे सारे सार चाणक्य नीति या ग्रंथाच्या रुपात लोकांपर्यंत अगदी सोप्या शब्दात स्पष्ट करुन पोहचविले आहेत.

आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. राजनीती आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रा वरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खासकरून यात मार्गदर्शन आहे.

आज कलियुगात देखील प्रत्येक व्यक्ती आचार्य यांनी चाणक्य निती मध्ये दिलेल्या धोरणांचे अनुसरण करून, त्या नियमांचे पालन करुन आपलं जीवन सुखकर आणि आनंदी बनवू शकतो. चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे.

जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे सर्व विषयांचे जाणकार होते, उत्तम असे विद्वान होते, सर्वांना हे माहित आहे, परंतु ते एक उत्तम जीवन प्रशिक्षक आणि व्यवस्थापन गुरू देखील होते.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनातील कडू आणि गोड अनुभवांमधून ते जे काही शिकले, त्याचे सार चाणक्य नीति ग्रंथात अतिशय स्पष्ट शब्दात लोकांना समजावून सांगितले. आचार्य आयुष्यभर धर्माच्या मार्गावर चालले आणि लोकांना योग्य मार्ग दाखवत राहिले.

त्यांनी एका सामान्य मुलाला सम्राट बनविले यावरून आचार्य यांच्या क्षमतेचा अंदाजा घेता येतो. आजही प्रत्येक व्यक्ती चाणक्य नितीतील आचार्य यांच्या धोरणांचे पालन करून आपले जीवन सुकर बनवू शकतो.

चाणक्य नितीमध्ये आचार्य चाणक्य यांनी अशा चार स्वभाव गुणांबद्दल सांगितले आहे, ते जर एखाद्या व्यक्तीकडे असतील तर त्या व्यक्तीला आयुष्यभर कधीही पैशाची कमतरता भासणार नाही, तसेच कधीही त्याचा कुणी शत्रू देखील बनू शकणार नाही.

1) जे प्रत्येक परिस्थितीत सतर्क राहतात, म्हणजेच ते नेहमी निर्भय असतात. असे लोक वर्तमानात जगतात आणि वर्तमान परिस्थितीनुसार रणनीती तयार करतात. वर्तमानात मेहनत करून त्यांचे भविष्य स्वतःच सुरक्षित होते.

2) ज्यांना आपल्या कामाची काळजी असते, अनावश्यक गोष्टींमध्ये ते आपला वेळ वाया घालवत नाहीत, इतरांच्या वादात पडत नाहीत, अशाही लोकांना शत्रू नसतात. अशा लोकांना कोणतीही बाब अत्यंत शांतपणे निकाली काढायला आवडते. त्यांची ही सवय त्यांना सर्व समस्यांपासून वाचवतेच पण पैशांच्या विणाकारणच्या खर्चापासूनही वाचवते.

3) जो माणूस या जगात देवावर विश्वास ठेवतो तो नेहमीच धर्ममार्गावर चालण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला हे माहिती असते की प्रत्येक कृतीची शिक्षा त्याला भोगावी लागेल, म्हणून तो पा-प करणे टाळतो. असे लोक केवळ चांगले कार्य करतात आणि मान सन्मान मिळवतात. त्यांचे सर्वच हितचिंतक आणि शुभचिंतकही असतात.

4) आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की, जे लोक कठोर परिश्रम करतात तसेच जे आपल्या कामाच्या प्रती अतिशय प्रामाणिक असतात त्यांना नेहमीच माता लक्ष्मींचा आशीर्वाद हा मिळत असतो.

असे लोक नेहमीच त्यांच्या परिश्रमांनी आपले नशीब बदलू शकतात तसेच नशिबाला चमकवतात. जरी ते गरीब असले तरीही ते लवकरच ते गरीबीतून मुक्त होत असतात.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *