गरुड पुराण हा हिंदू धर्मातील प्रसिद्ध धार्मिक ग्रंथांपैकी एक आहे. हे 18 पुराणांपैकी एक मानले जाते. गरुड पुराणात आपल्या जीवनाबद्दल अनेक र’हस्यमय गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहित असणे आवश्यक आहे.
या पुराणातील प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, पु’ण्य, निःस्वार्थ कर्मे याबरोबरच त्याग, दान, तपस्या, तीर्थयात्रा इत्यादी शुभ कर्मांमध्ये प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक आणि पारलौकिक फळ यांचे वर्णन करण्यात आले आहे.
सनातन हिंदू धर्मात मृ’त्यूनंतर गरुड पुराण ऐकण्याची तरतूद आहे. हिंदूंमध्ये अशी श्रद्धा आहे की, जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणजे हिंदू सनातन धर्म. गरुड पुराण हे वैष्णव संप्रदायाशी संबंधित एक महापुराण आहे. सनातन धर्मात मृ’त्यू नंतर मो’क्ष देण्याचा विचार केला जातो. म्हणूनच सनातन हिंदू धर्मात मृ’त्यूनंतर गरुड पुराण ऐकण्याची तरतूद आहे.
पहिले पाप – सामान्यतः स्त्रीचा अपमान कधीच करू नये, परंतु गरोदर किंवा मासिक धर्म दरम्यान स्त्रीला वाईट बोलणे महापाप आहे. अशा व्यक्तीला महादेव आणि देवता माफ करत नाहीत.
दुसरे पाप – इतरांचे धन प्राप्त करण्याची इच्छा ठेवणे, हेसुद्धा शास्त्रानुसार पाप आहे. तिसरे पाप – एखाद्या सध्या-सरळ व्यक्ती ला किंवा जीवाला कष्ट देणे, नुकसान पोहोचवणे त्यांच्यासाठी बाधा निर्माण करणे हेसुद्धा महापाप आहे.
चौथे पाप – चांगले-वाईट, चूक-बरोबर जाणून घेतल्यानंतरही चुकीचे काम करणे महापाप आहे. पाचवे पाप – इतरांच्या पती किंवा पत्नीवर वाईट नजर ठेवणे किंवा त्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हेसुद्धा महापाप आहे.
सहावे पाप – इतरांचा मान-सन्मान कमी करण्याच्या इच्छेने खोटे बोलणे, छळ-कपट करणे, षडयंत्र रचणे महापाप आहे. सातवे पाप – लहान मुलं, महिला किंवा कोणत्याही कमजोर व्यक्तीची हिंसा करणे, असामाजिक कर्म करणे महापाप आहे.
आठवे पाप – एखाद्या मंदिरातील वस्तू चोरणे किंवा चुकीच्या पद्धतीने इतरांची संपत्ती हडपणे महापाप आहे. नववे पाप – गुरु, आई-वडील, पत्नी किंवा पूर्वजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला महादेव कधीही माफ करत नाहीत.
दहावे पाप – नशा करणे, दान केलेल्या वस्तू किंवा धन परत घेणे महापाप आहे. कोणत्याही अधार्मिक कामामध्ये सहभागी होणे महापाप आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!