श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरात छोटेसे यज्ञकुंड असावे. जेव्हा मन अशांत असेल, घरात उगाच अडचणी येतात, तेव्हा आपल्या घरात आपण छोटासा होम करावा. शिवकवच स्त्रोत्र म्हणावे. कर्पूर होम केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.
देवतांना प्रसन्न करण्यासाठी होमाचे अनेक प्रकार आपल्याकडे सांगितले आहेत. यामधील एक ‘कर्पूर होम’ हा तंत्रशास्त्रातील प्रभावशाली होम आणि विधी आहे. यामध्ये शेंडी ठेवून सोललेल्या नारळावर कापडाची वडी प्रज्वलित केली जाते. पहिली वडी संपताच दुसरी वडी ठेवावी. अशा प्रकारे कापराची ज्योत तेवत ठेवावी. कर्पूरहोम करताना हरिद्वार येथील ब्रह्मकुंडावर बसलो आहोत असा विचार केला जातो.
नारळातील पाण्याचा बाहेरील वातावरणाशी संपर्क येत नाही. त्यामुळे ते गंगेप्रमाणेच शुद्ध, प्रदूषणरहित, स्फटिकासारखे शुद्ध आणि पवित्र असते, तर नारळाचे कवच म्हणजे हरिद्वारच्या ब्रह्मकुंडाचा काठ मानला जातो. तिथे यज्ञ केल्यावर जेवढे फळ मिळते, तेवढेच फळ कर्पूर होमाचे मिळते. कारण हा होम करताना परमपावन अशा अग्नीचा संयोग होतो. त्यातून निर्माण होणारी स्पंदने मनाची संवेदनशीलता वाढवतात. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढून इच्छाशक्ती तीव्र होते. या इच्छाशक्तीच्या बळावर मनोकामना पूर्ण होण्यास सहाय्य होते. अनामिक मनःशांती मिळते.
कर्पूर होम करताना – मंत्र किंवा स्तोत्र म्हटले नाही तरी चालते, मात्र अशावेळी आपल्या सद्गुरूंचे किंवा इष्ट देवतेचे नामस्मरण, मंत्रजप किंवा स्तोत्र पठण जर कर्पूराच्या अग्नीसमोर केले तर त्याचे मिळणारे फळ वाढते. एकाच नारळावर हव्या तितक्या प्रमाणात कापूर जाळता येतो. त्यामुळे नारळ जळत नाही.
काही दिवसांनी नारळातले पाणी आटते किंवा तो सुकून जातो. अशावेळी अमावस्या किंवा पौर्णिमेला नारळ बदलावा. नारळ तडकला, फुटला तरीही नारळ कचऱ्यात न टाकता त्याचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे आणि नवा नारळ घ्यावा. देवाकडून आशीर्वाद हवा असेल तर नारळाची शेंडी देवाकडे करावी.
मात्र आत्मनिवेदन, ध्यानधारणा, त्राटक करताना शेंडी स्वतःकडे ठेवावी. जात, धर्म, लिंग, वय, अशौच असा कोणताही अडथळा कर्पूर होम करताना येत नाही. संकटकाळी हातपाय धुवून किमान केलेली शारीरिक शुचिता कर्पूर होमास पुरेशी ठरते.
घरात शांती लाभते – घर खरेदी करायचे असेल तर एकदम दोन-तीन चांगली घरे दृष्टिपथात येतात किंवा उपवर मुलीला एकाच वेळी तीन-चार चांगली स्थळे येतात. तसेच एकाचवेळी अनेक ठिकाणाहून नोकऱ्यांची नेमणूकपत्रे येतात. अशा वेळी नेमकी निवड कशी करावी, अशा द्विधा मनःस्थिती निर्माण होते, तेव्हा या पेचप्रसंगी कर्पूर होमासारखा पर्याय नाही.
समस्यांचे निराकरण – कधी कधी कर्पूर होमाच्या वेळी नारळ तडकतो. अशावेळी लगेच दुसरा नारळ घेऊन कर्पूर होम करावा. एखादे स्तोत्र वा ठराविक संख्येचा जप चालू असताना नारळ तडकला तर ते स्तोत्र वा जप पूर्ण करून नारळ बदलावा. तडकलेला नारळ खाण्यास योग्य असेल तर त्याचा घरात वापर करावा, नाहीतर विसर्जित करावा. काही वेळा कर्पूर होम सुरू असल्यास नारळातून पाणी येऊ शकते. असे झाल्यास नारळ बदलावा. नारळाची शेंडी देवाकडे करून योग्य पर्याय मिळेपर्यंत कर्पूर होम करावा.
कर्पूर होमाचे फायदे – रोज सकाळी आणि संध्याकाळी कर्पूर होम करावा. यामुळे घरात शांतता लाभायला मदत होते. महत्त्वाच्या कामाला निघण्यापूर्वी कर्पूर होम केला जातो. कारण बऱ्याचदा कसोटीचे प्रसंग येतात, बुद्धी चालेनाशी होते, निर्णय घेणे जड जाते. अशावेळी कर्पूर होम केल्यास फायदा होतो. कर्पूर होम केल्यानंतर थोडा वेळ शांत बसावे. त्यामुळे मन स्थिर होते. परिस्थिती अनुकूल होण्यास मदत होते.
केव्हा आणि कसा करावा – कर्पूर होम कोणत्याही वेळी करता येतो, मात्र दररोज ठरावीक वेळी केल्यास आवाहन केलेली देवता त्याचवेळी उपस्थित असल्याचे जाणवते.
ज्यावेळी शोक, दुःखाची भावना उफाळून येते. मन हताश होते, त्यावेळी कर्पूर होम केल्यास नैराश्य दूर पळते. मनाला उत्साह जाणवू लागतो.
फलनिष्पत्ती होईपर्यंत एकाच नारळावर कर्पूर होम करता येतो. नारळावर एकाच जागी कापूर लावण्याऐवजी जागा बदलली तरी चालते. त्यामुळे एकच नारळ त्यातील पाणी संपेपर्यंत वापरता येतो. काही दिवसांनी पाणी आटल्यावर तसेच #अमावस्या, #पौर्णिमा या तिथींनी नारळ भग्न पावल्यास त्या जागी नवीन नारळ घ्यावा. पहिला नारळ प्रसाद म्हणून भक्षण करता येतो. नारळ नासला असेल तर विसर्जित करावा. ॥श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली॥
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.