घरच्या घरी गृहप्रवेश आणि कलशपुजन कसे करावे.

आपण पुष्कळ वेळा गृहप्रवेश करतांना वास्तुशांती करतोच असे नाही, घाई असते, कींवा कोणत्याही कारणास्तव आपण वास्तु पुजन करणे पुढे ढकलतो. कींवा काही कारणास्तव स्वतःचे घर असतांनाही आपणास भाडेचे घरात प्रवेश करणे, राहणे, असे अत्यावश्यक असते. तेव्हा शुभमुहूर्तावर कलशपुजन करुन मगच गृहप्रवेश करावा. कसे करावे कलश पुजन.. .?

जर गुरुजी मिळत नसतील तर घरच्या घरी साधे गृहप्रवेश पूजन कसे करावे. कधी कधी घाई गडबडीत जागेचे पजेशन कोणत्याही दिवशी घ्यावे लागते व या धावपळीत चांगल्या मुहूर्तावर गुरुजी मिळत नाहीत व गृहप्रवेशचे काय करायचे हा प्रश्न पडतो. अशा प्रसंगासाठी घरातल्या घरात साध्या पध्दतीने गृहप्रवेश कसा करायचा हे येथे देत आहे.

अर्थातच नंतर तज्ञ जाणकार गुरुजींकडून पुन्हा हे पूजन करूनच घ्यावे. फक्त चांगला मुहूर्त हातचा जाऊ नये यासाठी हा प्रयत्न.. रविवार व मंगळवार यादिवशी शक्यतो शुभारंभ, गृहप्रवेश, वास्तुशान्ति वैगेरे कर्म करू नये. सर्वप्रथम आदल्या दिवशी किंवा दोन तीन दिवस आधी वैगेरे सर्व जागा स्वच्छ साफ करून घ्यावी. जागे मध्ये सर्वत्र गोमूत्र – गंगाजल शिंपडावे. जमल्यास पाण्यामध्ये गोमूत्र – मीठ वैगेरे टाकून त्या पाण्याने फरशी पुसून घ्यावी.

ज्या दिवशी गृहप्रवेश करायचा आहे त्या दिवशी सुद्धा सकाळी वैगेरे जागेमध्ये पुन्हा गोमूत्र गंगाजल शिंपडावे. सर्वात प्रथम देवाच्या वस्तु अशा जागेत न्याव्यात. उदा. कलश, दिवा, समई, देवांचे फोटो, इत्यादी. दरवाजाला हार तोरण लावणे. रांगोळी काढणे. किचन मध्ये पूर्व दिशेच्या भिंतीकडे पाट ठेवून त्यावर देवाचा फोटो ठेवणे. त्या समोर धूप दिप लावणे. वाटीत साखर ठेवणे. असल्यास पेढे ठेवणे.

जमल्यास कलश मध्ये पाणी भरून त्यात रुपया हळदकुंकू दुर्वा तुळस इत्यादी टाकून त्यावर नारळ ठेवून तो कलश स्थापन करू शकतात. फोटोला कलशाला हार फुले हळदकुंकू वैगेरे वाहणे. दरवाजावर हळद, कुंकू, चंदन, अष्टगंध, गंगाजल, गोमूत्र इत्यादी पैकी जे जे असेल ते एका वाटीत किंवा द्रोणात घेऊन एकत्र करून शुभ-लाभ – ऊँ – स्वस्तिक – श्री आदि काढणे.

तसेच घरामध्ये सुद्धा भिंतीवर जिथे शक्य असेल तिथे काढणे. किचन मध्ये टाईल्स वर तसेच जिथे देवाचा फोटो ठेवून पूजा करणार असाल तिथे सुद्धा काढणे. सर्व खोल्यांमध्ये धूप लावणे.. प्रत्येक खोली मध्ये एका कोपऱ्यात चिमूटभर साखर ठेवणे. किचन ओट्यावर गॅ’स, स्टो’व्ह, इं’डक्शन वर एका भांड्यात दूध उकळवायला घेणे, ते उकळून आपोआप ओतू जाऊ देणे. त्या दुधात थोडी साखर टाकलेली असावी. किचन ओट्यावर दूध ओतू गेल्यावर ते लगेच पुसू नये. थोड्या वेळानंतर पुसावे.

उरलेले दूध सर्वांनी घ्यावे, त्याचा चहा केला तरी चालेल. आजू बाजूच्या व्यक्तींना दिला तरी चालेल. सोमवार सोडून इतर दिवशी नारळ वाढवून त्याचा प्रसाद वाटावा. हे सर्व करत असताना कुलदेवताचे, वास्तुपुरुषाचे नामस्मरण करणे. येत असलेले कोणतेही स्तोत्र मंत्र जप म्हणणे किंवा स्तोत्र ऑडिओ लावणे. कोणतेही काम हे त्या त्या कामातील अनुभवी तज्ज्ञांकडून केलेले योग्य असते. आपण स्वतः जरी गृहप्रवेश केला असला तरी आपल्या जाणकार तज्ञ गुरुजींकडून योग्य दिवशी विधिवत शास्त्रशद्ध रीतीने गणेशपजन करून घेणे.

कारण सतत वेद पुराण मंत्र म्हणून म्हणून व अनेक व्रत उपासना करून सात्विक ब्राह्मणाच्या भोवती एक वेगळेच वलय तयार झालेले असते ट्युले त्याच्या कडून म्हंटले गेलेल्या मंत्राघोषामुळे आपले घर वातावरण पवित्र होते व आपले इच्छित साध्य होण्यास जास्त शक्यता असते. कधीही मां’साहार करू नये, कारण मां’साहाराने त्या प्राण्यांचा तळतळाट लागून भले आपल्याला व आपल्या पुढील पिढ्याना सुद्धा जीवनात त्रास होतोच होतो. सध्याच्या युगातील जवळपास 75 टक्के त्रास, दोष हे मांसाहार केल्यामुळे होतात हे खात्री व अनुभवपूर्वक सांगू शकतो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *